मुंबई : घाईघाईने ट्रेन पकडताना लोकलखाली जाणाऱ्या दोघांचा जीव आरपीएफच्या दोन जवानांनी वाचवला आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेवरील कुर्ला रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली असून रविवारचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सातवर ट्रेनमध्ये एक महिला आणि तिची मुलगी चढत होती. त्याचवेळी लोकल सुरु झाली आणि त्यातच मुलगी खाली पडून लोकलच्या खाली जात असताना प्रमोद गीतेंनी प्रसंगावधान दाखवलं आणि लोकलखाली जाणाऱ्या मुलीला बाहेर ओढलं.

मुलीला वाचवण्यात यश आलं, तर तिच्या आईचा जीवही कर्तव्यावर असलेल्या विकास पाटील यांनी वाचवला. त्यामुऴं विकास पाटील आणि प्रमोद गीते यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान घाई कशी जीवावर बेतू शकते, ते पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आलं आहे.

पाहा व्हिडिओ :