नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची 400 फूट असणार आहे. या पुतळ्याच्या पायाला विशेष रचना केली जाणार आहे, ज्यात लिफ्ट असेल. या लिफ्टद्वारे पुतळ्याच्या आतून वरपर्यंत जाता येईल, अशी माहिती शिल्पकार राम सुतार यांनी दिली आहे.

राम सुतार यांच्याशी 'माझा'ने एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. यामध्ये त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याची रचना सांगितली आहे. आजवर अनेक पुतळे बनवले, मात्र शिवरायांचा पुतळा बनवायला मिळणं हे भाग्य आहे, असं राम सुतार म्हणाले.



शिवरायांच्या 400 फूच उंच पुतळ्याच्या आतून लिफ्टद्वारे वरपर्यंत जाता येणार आहे. वर जाऊन अरबी समुद्रातून संपूर्ण मुंबईचं दर्शन घेता येईल, अशी माहिती 93 वर्षीय राम सुतार यांनी दिली.



सरदार पटेल यांचा 522 फूट उंची पुतळा देखील राम सुतार यांनी तयार केलेला आहे.

24 डिसेंबरला मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमीपुजन केलं जाणार आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक तयार करण्यासाठी 16 ठिकाणाहून पाणी आणि माती आणण्यात येणार आहे. शिवाय छत्रपती आणि सरदार घराण्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात 16 ठिकाणाहून माती आणि पाणी येणार

– शिवनेरी

– रायगड

– पन्हाळा

– शिखर शिंगणापूर

– तुळजापूर

– सिंदखेड राजा

– कराड

– जेजुरी

– राजगड

-प्रतापगड

-देहू आळंदी

-रामटेक

– वेरूळ

– प्रकाशा

– नाशिक