एक्स्प्लोर
नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याच्या घरात नोकराचाच दरोडा
खिडकीची ग्रील वाकवून बेडरूम मध्ये आरोपीने प्रथम प्रवेश केला. यानंतर घरातील किंमती दागिने आणि पैसे लुटले.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेते आणि शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले यांच्या घरी नोकरानेच दरोडा टाकला. काल संध्याकाळी घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत आरोपीने हातसफाई केली. 19 वर्षीय आरोपी अनुराग सिंग हा गेल्या पाच वर्षांपासून विजय चौगुले यांच्याकडे कामाला होता. काल संध्याकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत आरोपी अनुरागने दरोडा टाकून 90 तोळे सोने आणि अडीच लाख रोख रक्कम घेवून पोबारा केला. एकूण 30 लाख किंमतीचा ऐवज आरोपीने लंपास केला आहे. खिडकीची ग्रील वाकवून बेडरूम मध्ये आरोपीने प्रथम प्रवेश केला. यानंतर घरातील किंमती दागिने आणि पैसे लुटले. चोरी करून इमारतीमधून बाहेर पडताना आरोपी प्लास्टीक पिशवी हातात घेऊन जात असल्याचे आढळले आहे. दरम्यान या प्रकरणी रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस टीम युपीला रवाना झाली आहे.
Before You Go
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?






















