एक्स्प्लोर
ब्लॉग माझा स्पर्धा २०१७ चे निकाल जाहीर
फेसबुक, ट्विटरसारख्या आधुनिक माध्यमांच्या व्यासपीठांवर अनेकजण लिहितात. मात्र या लेखनाला दीर्घ स्वरुप आणि रचनात्मक रुप मिळतं, ते ब्लॉगसारख्या व्यासपीठामुळे.

मुंबई : एबीपी माझाच्या ‘ब्लॉग माझा 2017’ स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. ‘व्यक्तानंद’ ब्लॉगचे ब्लॉगर आनंद मोरे यांना प्रथम पारितोषिक मिळालं आहे, तर ब्लॉगर अनिल गोविलकर आणि अक्षय शेलार यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळालं आहे. त्याचसोबत पाच उत्तेजनार्थ स्पर्धकही निवडण्यात आले.
स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक राजन खान आणि भारतीय तसेच पाश्चिमात्य संगीताचे अभ्यासक, स्तंभलेखक डॉ. आशुतोष जावडेकर लाभले.
फेसबुक, ट्विटरसारख्या आधुनिक माध्यमांच्या व्यासपीठांवर अनेकजण लिहितात. मात्र या लेखनाला दीर्घ स्वरुप आणि रचनात्मक रुप मिळतं, ते ब्लॉगसारख्या व्यासपीठामुळे. या व्यासपीठावरील लेखनास अधिक प्रोत्साहन मिळावं म्हणून एबीपी माझातर्फे दरवर्षी ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा आयोजित करण्यात येते.
यंदा या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद लाभला. 300 हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मराठी भाषेतून ब्लॉग लेखनाचं हे अवकाश विस्तारत जात आहे, अशीच ही आकडेवारी सांगते.
ब्लॉग माझा २०१७ स्पर्धेचे विजेते :
प्रथम क्रमांक – आनंद मोरे
ब्लॉगचे नाव - व्यक्तानंद
ब्लॉग लिंक - www.anandmore.com
द्वितीय क्रमांक – अनिल गोविलकर
ब्लॉगचे नाव - अनिल गोविलकर ब्लॉग
ब्लॉग लिंक - www.govilkaranil.blogspot.com
तृतीय क्रमांक – अक्षय शेलार
ब्लॉगचे नाव - द सिने रिपोर्टर
ब्लॉग लिंक - abshelar.wordpress.com
उत्तेजनार्थ 1 - रेणुका खोत
ब्लॉगचे नाव - Diary Of Rekho
ब्लॉग लिंक - https://diaryofrekho.blogspot.in/
उत्तेजनार्थ 2 - तुषार म्हात्रे
ब्लॉगचे नाव - तुषारकी
ब्लॉग लिंक - www.tusharki.blogspot.in
ब्लॉग लिंक - https://vikaspandhare.blo
उत्तेजनार्थ 3 - सानिया भालेराव
ब्लॉगचे नाव - saniya indites
ब्लॉग लिंक - https://saniyaindites.wordpress.com
उत्तेजनार्थ 4 - विकास पांढरे
ब्लॉगचे नाव - ग्लोबल व्हिलेजgspot.in
उत्तेजनार्थ 5 - योगेश अहिरे
ब्लॉगचे नाव - Yogesh Ahire
ब्लॉग लिंक - www.ahireyogesh.blogspot.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
