एक्स्प्लोर

वेटर ते मॅनेजर सगळे तृतीयपंथी, नवी मुंबईतील ‘थर्ड आय कॅफे’

‘थर्ड आय कॅफे’ या रेस्टॉरंटमध्य या तिघांनी वेटरपासून मॅनेजरपर्यंत तृतीयपंथीयांना नोकरी दिली. अर्थात, नावं ठेवणाऱ्यांनी ठेवलीच. मात्र पाठीवर कौतुकाची थाप देऊन प्रोत्साहन देणारेही अनेकजण होते.

मुंबई : आपण कितीही आधुनिकतेच्या बाता मारल्या, तरी तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही कित्येकांचा बदललेला नाही. कुणी तृतीयपंथी दिसला की नाकं मुरडणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशा काहीशा अस्वस्थ करणाऱ्या भोवतालात आणि सकारात्मकतेला काळोखाने व्यापू पाहणाऱ्या वातावरणात प्रकाशाचा एक आशादायक किरण म्हणजे ‘थर्ड आय कॅफे’. नवी मुंबईतील ‘थर्ड आय कॅफे’ आणि इथे काम करणाऱ्या मही, जोया, सोनाली, जॉजेन या साऱ्या तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असे काम करत आहेत. तृतीयपंथीय समाजाला एक नवी दृष्टी आणि स्वाभिमानी ओळख दिली आहे. निमिश शेट्टी, प्रसाद शेट्टी आणि नितेश कंदरकर या तिघांनी मिळून डिसेंबर महिन्यात नवी मुंबईत एक रेस्टॉरंट उघडलं. ‘थर्ड आय कॅफे’ असं त्याचं नाव. खरंतर हे तिघेही वेगवेगळ्या क्षेत्रातले. निमिश आर्किटेक्चर क्षेत्रातील, प्रसाद मार्केटिंग क्षेत्रातील, तर नितेश बँकिंग क्षेत्रातील. हे रेस्टॉरंट उघडण्यामागे त्यांची एक अनोखी अन् तेवढीच अभिमानास्पद अशी संकल्पना होती. ‘थर्ड आय कॅफे’ या रेस्टॉरंटमध्य या तिघांनी वेटरपासून मॅनेजरपर्यंत तृतीयपंथीयांना नोकरी दिली. अर्थात, नावं ठेवणाऱ्यांनी ठेवलीच. मात्र पाठीवर कौतुकाची थाप देऊन प्रोत्साहन देणारेही अनेकजण होते. वेटर ते मॅनेजर सगळे तृतीयपंथी, नवी मुंबईतील ‘थर्ड आय कॅफे’ जॉजेन मॅनेजर आहेत, तर माही, सोनाली, जोया, मालिनी वेटरचं काम पाहतात. ग्राहकांच्या स्वागतापासून त्यांना कोणता मेन्यू आवडेल इथवर, सर्व कामं अगदी आनंदाने करतात. या रेस्टॉरंटच्या निमित्ताने त्यांना एक वेगळं व्यासपीठ मिळालं आहे, जिथे स्वत:ला सिद्ध करणे शक्य आहे. “ज्यावेळी मी कामाला सुरुवात केली, तेव्हा मनामध्ये भीती होती. लोक स्वीकारतील का वगैरे. पण लोकांकडून खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. आता आमच्यामध्ये टेबल अटेंड करण्यासाठी भांडण होत आहेत.”, असे किती आनंदाने माही सांगत होती. तृतीयपंथीयांना व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्यांना कामं मिळाली पाहिजे, अशा फक्त वाऱ्यावरील बाता न मारता, निमेश-प्रसाद-नितेश या त्रिकुटाने ते सत्यात उतरवलं आणि एका आदर्श पावलाची वाट चालली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Embed widget