एक्स्प्लोर
30 जूनच्या मध्यरात्री हॉटेल बंद राहणार!

मुंबई : येत्या शुक्रवारी जर हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा प्लॅन आखत असाल तर तुम्हाला मध्यरात्रीच्या आधीच आटोपता घ्यावा लागणार आहे. कारण शनिवार, 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने 30 जून रात्री साडेअकरापासून रात्रभर मुंबईतील हॉटेल बंद असतील. एरव्ही बरेचसे रेस्टॉरंट रात्री 1.30 वाजता बंद होतात. पण शुक्रवार, जरी तो धंद्याचा दिवस असला तरी रेस्टॉरंट रात्री 11.30 वाजता बंद होणार किंवा मध्यरात्रीपर्यंत ऑर्डर स्वीकारल्या जातील. काही तांत्रिक अडचणी आहेत. जीएसटी सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी सिस्टम रिबूट केल्या जाणार आहेत. या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 30 जूनला मध्यरात्री राजधानी दिल्लीत जीएसटीचं अधिकृतरित्या लॉन्चिंग होणार आहे. यानंतर 1 जुलै रोजी एका विशेष कार्यक्रमात जीएसटी लागू झाल्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
Before You Go
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग






















