एक्स्प्लोर

अनिल अंबानींच्या आरकॉम विरोधात दिवाळखोरीची याचिका

रिलायन्स कम्यूनिकेशनचे अनिल अंबानी चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण, चायना डेव्हल्पमेंट बँक (CDB) ने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT) कडे आरकॉमला दिवाळखोर जाहीर करण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई : रिलायन्स कम्यूनिकेशनचे अनिल अंबानी चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण, चायना डेव्हल्पमेंट बँक (CDB) ने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT) कडे आरकॉमला दिवाळखोर जाहीर करण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे. सीडीबीने अनिल अंबानींच्या आरकॉमला 125 अब्ज रुपयांचं कर्ज दिलं होतं. पण कर्जाची परतफेड अद्याप झालेली नसल्याने, सीडीबीने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे धाव घेऊन याचिका दाखल केली. बँकेकडून मुंबई हायकोर्टाचे वरिष्ठ वकील दरिस खंबाटा हे काम पाहात आहेत. तर अल्वारेज ऐंड मार्शलचे अभिलाष लाल मध्यस्थी करत आहेत. सीडीबीने एनसीएलटीकडे याचिका दाखल केल्यानंतर आपल्याला अश्चर्यचा धक्का बसल्याचे आरकॉमकडून सांगण्यात येत आहे. कारण, सीडीबीसह इतर देणेकऱ्यांसोबत या संकटावर मात करण्यासाठी तोडगा काढण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आरकॉमचं एअरटेलमध्ये विलनीकरणासंदर्भातील चर्चा फिस्कटल्यानंतर आरकॉम विरोधात हे चौथं प्रकरण आहे. स्वीडनच्या टेलिकॉम इक्विपमेंट मेकर एरिक्सननेही आरकॉमकडून 1150 कोटी रुपयेची थकबाकी वसूल करण्यासाठी वाद सुरु आहेत. तर मणिपाल टेक्नॉलॉजीनेही आपली दोन लाख 74 हजार कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी NCLT कडे धाव  घेतली आहे. त्यामुळे सीडीबीने दाखल केलेल्या याचिकेनंतर याचा परिणाम सोमवारी मुंबई शेअर बाजारावरही पाहायला मिळाला. सोमवारी आरकॉमचे शेअर 1.1 टक्क्यांनी घसरुन 13.35 रुपयांवर बंद झाले. दरम्यान, मार्च अखेर आरकॉमवर एकूण 50 हजार कोटींचा कर्जाचा बोजा झाला आहे. त्यातच मार्च 2016 मध्ये मोदी सरकारने दिवाळखोरी आणि कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनींकडून बँक आणि गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवण्यासाठी ‘इन्सॉलव्हन्सी आणि बँकरप्सी’ कायदा पारित केला. त्यातच अनिल अंबानींची कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोदी सरकारने पास केलेल्या कायद्याअंतर्गत येणारं हे पहिलं हायप्रोफाईल प्रकरण असल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget