एक्स्प्लोर

महिला रुग्णावर बलात्कार, आरोपी डॉक्टरला पोलीस कोठडी

शारीरिक संबंधांना नकार दिल्यास क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी डॉक्टरने तिला अनेक वेळा कोणी नसताना क्लिनिकवर बोलावले आणि तिच्यावर लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केली, असे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.

मुंबई : डॉक्टरला देवाचं दुसरं रूप म्हटलं जातं, पण या पेशाला काळिमा फासणारं धक्कादायक कृत्य मुंबईतील एका वयस्कर डॉक्टराने केलं आहे. आपल्या महिला रुग्णावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मेघवाडी पोलिसांनी मुंबईतील एका 58 वर्षीय डॉक्टरला अटक केली आहे. अश्लील व्हिडीओ क्लिप बनवून ती सोशल माध्यमात पोस्ट केल्याचाही डॉक्टरवर आरोप आहे. हॉलिडे कोर्टाने रविवारी आरोपीला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पीडित तरुणी जोगेश्वरी पूर्वेला आपल्या आई-वडिलांसोबत राहते. पीडित तरुणी मूळव्याधाच्या आजाराने ग्रस्त होती. आरोपी डॉक्टर तिच्यावर या आजारासाठी उपचार करत होता. पीडित तरुणीला वेदना होत असल्याने 28 मे 2015 रोजी डॉक्टरने तिला इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर तिला झोप लागली. जेव्हा ती घरी आली तेव्हा आरोपी डॉक्टरने तिच्या मोबाईलवर एक क्लिप पाठवली होती. या व्हिडीओमध्ये ती आणि आरोपी डॉक्टर आक्षेपार्ह अवस्थेमध्ये होते. याबद्दल कुठे वाच्याता करु नको अशी धमकी डॉक्टरने दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा पीडित तरुणी जाब विचारण्यासाठी आरोपी डॉक्टरच्या क्लिनिकवर पोहोचली. तेव्हा त्याने शारीरिक संबंधांना नकार दिल्यास क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी डॉक्टरने तिला अनेक वेळा कोणी नसताना क्लिनिकवर बोलावले आणि तिच्यावर लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केली, असे पीडित तरुणीचे म्हणणे आहे. डिसेंबर 2018 मध्ये पीडित तरुणीचे लग्न झाले आणि ती सासरी घरी गेली. अलीकडे  हा डॉक्टर पुन्हा पीडित तरुणीच्या संपर्कात आला. त्याने पुन्हा लैंगिक संबंधांसाठी तिच्यावर दबाव टाकला. आपले म्हणणे ऐकले नाही तर व्हिडीओ व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली.  त्याचे म्हणणे न ऐकल्याने तीन ऑक्टोबरला पीडित तरुणीच्या नवऱ्याच्या मोबाईलवर तिची आणि डॉक्टरची क्लिप त्याने पाठवली. जेव्हा पीडितेच्या पतीने याबद्दल आपल्या बायकोला जाब विचारला. तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दोघे नवरा-बायको पोलीस स्टेशनला गेले आणि आरोपी डॉक्टरविरोधात तक्रार नोंदवली.  हॉलिडे कोर्टाने रविवारी आरोपीला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Embed widget