एक्स्प्लोर

पाच वर्षात बलात्काराच्या घटना दुपटीने वाढल्या!

मुंबईत 2012-13 मध्ये बलात्काराच्या 293, तर छेडछाड, विनयभंगाच्या 793 घटना घडल्या होत्या.

मुंबई:  राज्यासह मुंबईतील गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच आहे. मुंबईत गेल्या पाच वर्षात बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर छेडछाडीच्या घटना 165 टक्क्यांनी वाढल्या आहेत. माहिती अधिकारात मुंबई पोलिसांनीच याबाबतची आकडेवारी दिली आहे. मुंबईत 2012-13 मध्ये बलात्काराच्या 294, तर छेडछाड, विनयभंगाच्या 793 घटना घडल्या होत्या. त्यानंतर पाच वर्षात या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2016-17 च्या आकडेवारीनुसार मुंबईत बलात्काराच्या 576 तर विनयभंगाच्या 2,103 घटना घडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे 72 टक्के बलात्कार पीडित मुली या अल्पवयीन आहेत. प्रजा या एनजीओने माहिती अधिकारात ही माहिती मिळवली. मुंबईत पाच वर्षात बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये घट झाली आहे. कारण 2012-13 मध्ये बलात्काराच्या 294 घटना घडल्या होत्या, तर 2015-16 मध्ये हा आकडा 728 वर पोहोचला होता. मात्र 2016-17 मध्ये त्यामध्ये घट होऊन तो 576 वर पोहोचला. खुनाचं प्रमाण घटलं त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे खुनाचं प्रमाण 30 टक्क्यांनी घटलं आहे. शिवाय सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्येही 72 टक्क्यांनी कपात झाली आहे. पार्ले, वांद्रे, कुर्ल्यात गुन्हे वाढले मुंबईत दररोज 40 पेक्षा जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदले जातात. उत्तर मध्य मुंबईतील विले पार्ले, कुर्ला आणि वांद्रे या भागातील गुन्ह्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याच भागात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. एप्रिल 2016 ते मार्च 2017 या काळात जवळपास बलात्काराचे 149 गुन्हे या भागात नोंदवण्यात आले. अल्पवयीन मुलींवर अत्याचार बलात्काराच्या घटना वाढल्या असतानाच, त्यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, बलात्कार पीडित बहुसंख्य मुली या अल्पवयीन आहेत. 2016 मधील आकडेवारीनुसार अल्पवयीन बलात्कार पीडित मुलींचं प्रमाण हे 72 टक्के इतकं आहे. म्हणजेच 10 पैकी सात गुन्ह्यातील पीडित मुली या अल्पवयीन आहेत. 2015 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या स्त्रीयांमध्ये 43 टक्के मुली या 12 ते 16 वयाच्या होत्या. त्यामुळे मुंबईत अल्प किंवा किशोरवयीन मुलींची सुरक्षितता धोक्यात असल्याचं प्रजा एनजीओच्या संस्थापिका निता मेहता यांनी म्हटलं आहे. पाच वर्षात बलात्काराच्या घटना दुपटीने वाढल्या!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Embed widget