एक्स्प्लोर
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ‘मातोश्री’वर

फोटो सौजन्य: ट्विटर
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पण ही भेट कुठल्याही राजकीय चर्चेसाठी नव्हती तर दानवेंच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी होती. 2 मार्चला रावसाहेब दानवे यांच्या मुलगा आमदार संतोष दानवेंचं लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी दानवेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ही भेट जरी राजकीय नसली असं सांगितलं जात असलं तरीही महापालिका निवडणूक निकालाच्या एकच दिवस आधी हे भेट घेण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया मात्र, उंचवल्या आहेत. पक्ष पातळीवर जरी शिवसेना-भाजपचे संबंध दुरावले असले तरीही भाजप नेत्यांचे संबंध अजूनही उद्धव ठाकरेंशी चांगले आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न असू शकतं अशीही सध्या चर्चा आहे. संबंधित बातम्या: पुन्हा एकत्र यायचं असल्यास शिवसेनेनं हात पुढे करावा: दानवे
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















