एक्स्प्लोर

नेहरु-गांधी परिवाराच्या डीएनएमध्येच राष्ट्रपुरुषांचा द्वेष; रणजित सावरकरांचा राहुल गांधींना टोला

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल नवी दिल्लीतल्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी माध्यमांशी बोलताना राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन आता देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यासह देशातल्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनीदेखील यात उडी घेतली आहे. रणजित सावरकरांनी राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर देत राहुल गांधींसह संपूर्ण नेहरु-गांधी परिवाराला लक्ष्य केले आहे.

रणजित सावरकर म्हणाले की, महापुरुषांचा अपमान हा नेहरु-गांधी परिवाराच्या डीएनएमध्येच आहे. राहुल गांधी यांचे पणजोबा पंडित नेहरु यांनीदेखील महापुरुषांचा अपमान केला आहे. मुस्लीम मतं मिळवण्यासाठी पंडित नेहरु छत्रपती शिवाजी महाराजांना लुटेरे म्हणाले होते. काल त्यांचे पणतू राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला.

सावरकर यांनी सत्ताधारी शिवसेनेला आणि विरोधी पक्ष भाजपला आवाहन केलं आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या कांग्रेसची महाविकास आघाडीमधून आणि राज्याच्या सत्तेमधून हकालपट्टी करावी आणि भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचं अल्पमतातील सरकार वाचवावं. अशा परिस्थितीत शिवसेनेचं सरकार वाचवणं, ही भाजपची नैतिक जबाबदारी असेल.

रणजित सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना अटक करण्याचे आदेश द्यावेत.

दरम्यान, राहुल गांधींच्या वक्तव्याचे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसे संकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सावरकरांबद्दल जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या शिवसेनेला आज कसली सौदेबाजी करावी लागतेय, असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. त्यावर शिवसेनेला सावरकरांबद्दल अभिमान असल्याचे शिवसेनेचे नेते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तर काँग्रेस नेते राजीव सातव यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

BJP Meeting in Mumbai: विरोधकांकडून एकापाठोपाठ एक हल्ले, सरकारच्या बचावासाठी मंत्री पुढे येईनात, भाजप प्रदेशाध्यक्षांकडून बैठकीत मंत्र्यांना कानपिचक्या, म्हणाले...
विरोधकांकडून एकापाठोपाठ एक हल्ले, सरकारच्या बचावासाठी मंत्री पुढे येईनात, भाजप प्रदेशाध्यक्षांकडून बैठकीत मंत्र्यांना कानपिचक्या, म्हणाले...
Shaina NC: सोनिया गांधींचा फोटो फाडताना तावातावात बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता यांची शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
सोनिया गांधींचा फोटो फाडताना तावातावात बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Satara District bank Chairman Election 2026: सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढला, उदयसिंह पाटील उंडाळकरांची अध्यक्षपदी निवड
सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढला, उदयसिंह पाटील उंडाळकरांची अध्यक्षपदी निवड

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Beed Crime News: पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Embed widget