मुंबई : राणा दाम्पत्याला मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच त्यांच्या जामीन अर्जावर येत्या 29 एप्रिलला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे येत्या 29 तारखेपर्यंत त्यांचा मुक्काम हा जेलमध्येच असेल. दरम्यान मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला हायकोर्टात आव्हान देत राणा दाम्पत्य आपल्या अटकेविरोधात दाद मागू शकतं.


नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्याने सांगितलं. यानंतर पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजार केले असताना त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 


खासदार नवनीत राणा यांची भायखळा तुरुंगात तर आमदार रवी राणा यांची तळोजा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कारागृहात पाठवण्यात आलं. दरम्यान नवनीत राणा यांची तब्येत खालावली आणि त्यांना भायखळा कारागृहाच्या रुग्णालयात दाखल केली. 


नवनीत राणा यांच्या विरोधात कलम 124 अ अंतर्गत राजद्रोहाचं कलम लावण्यात आलं असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचं कलम लावण्यात आलं आहे. याशिवाय कलम 353 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही राणा दाम्पत्यावर दाखल झाला आहे.


 


संबंधित बातम्या


Navneet Rana: नवनीत राणा यांची भायखळा तुरुंगात रवानगी, तब्येत खालावली


Ravi Rana and Navneet Rana: नवनीत राणा भायखळा, तर रवी राणा तळोजा तुरुंगात!


कारागृहात बसूनही हनुमान चालिसा वाचू शकता; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला


Ravi Rana and Navneet Rana : मोठी बातमी! राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी, राजद्रोहाचा गुन्हा


राणा दाम्पत्याला अटक; चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसात गुन्हा, आज कोर्टात हजर करणार