Ramdas Kadam Majha Katta : शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत अनेक गौप्यस्फोट केले. कदम खानदानाला राजकारणातून संपवायचं हे मातोश्रीवर ठरलं असा गौप्यस्फोट त्यांनी केला. तसंच आदित्य ठाकरे हे आमदारांना गद्दार म्हणत आहे. त्यांनी बोलताना थोड भान ठेवलं पाहिजे असे मत शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी व्यक्त केलं. त्यांचे वय 32 वर्ष आहे, माझे पक्षासाठी योगदान 52 वर्ष आहे. त्यांना अशी वक्तव्य शोभत नाहीत. त्यांनी जो बोलतो ते करुन दाखवाव असेही कदम म्हणाले. हे आमदारांचे बंड नाही हा उठाव आहे. मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो, तसेच आमदारांचे देखील अभिनंदन करतो असे रामदास कदम म्हणाले. पुढची अडीच वर्ष अशीच गेली असती तर शिवसेनेचे 10 आमदार देखील निवडून आले नसते असेही ते म्हणाले.
रामदास कदम यांच्या कट्ट्यातील दहा महत्वाचे मुद्दे
जोपर्यंत न्यायालयाचा अधिकृत निकाल लागत नाही तोपर्यंत पक्ष कोणाचा हे मी बोलणार नाही.
वाईट वाटलं म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी निघालं. आता माझ्या डोळ्यात पाणी येणार नाही, आता त्रास देणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढणार.
तुम्ही किती लोकांची हकालपट्टी करणार. मी 52 वर्ष पक्षासाठी दिले, माझी हकालपट्टी केली
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आहे. 25 वर्षानंतर मराठी माणूस किती शिल्लक आहे याचा विचार करायला हवा. समजनेवालो को इशारा काफी होता है
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना शेवटच्या क्षणापर्यंत मी आणि बाळा नांदगावकर त्यांच्यासोबत एकत्र होतो. ते माझे जवळचे मित्र आहेत. राज ठाकरे गेले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले.
राज ठाकरेंच्या जवळ असल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या मनात खदखद होती का? राज ठाकरेंना परत शिवसेनेत आणण्यासाठी मी प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही
राज ठाक माझा मुलगा कोणत्याही पक्षात जाणार नाही. शिवसेना सोडणार नाही.
बाळासाहेबांचा विचार आणि भगवा झेंडा सोडून दुसरं काही करणार नाही. बेईमानी करणार नाही. तसे काय केले तर एका मिनीटात त्याचा राजीनामा घेईन
1995 ला बाळासाहेबांची इच्छा असूनही मला मंत्रीपद मिळालं नाही, कारण राज ठाकरेंच्या जवळ होतो
मराठा आरक्षण आणि मुंबई गोवा हायवेच्या कामाबद्दल मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंशी बोललो, त्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचं सांगितलंय