एक्स्प्लोर

एबीपी माझाचा इम्पॅक्ट; 350 दिव्यांग कुटुंबांना राम कदमांकडून मदतीचा हात, तर श्रीकांत शिंदे ट्रस्ट घेणार दोन्ही गर्भवती महिलांची जबाबदारी

दिव्यांग बांधवांना मदत केल्यानंतर ' एबीपी माझा' शी बोलताना आमदार राम कदम यांनी दिव्यांग बांधवांच्या अडचणींना वाचा फोडल्यामुळे एबीपी माझाचं विशेष कौतुक केलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच पत्र लिहून अंध बांधवांसाठी या कठीण काळात ठोस उपाय योजना करण्यासाठी मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे.

वांगणी : एबीपी माझाने दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावातील दिव्यांग बांधवांच्या व्यथा दाखवल्या होत्या. त्यानंतर आज भाजप आमदार राम कदम यांनी या बातमीची दखल घेत स्वतः वांगणी गावात जाऊन सर्व दिव्यांग बांधवांना महिनाभर पुरेल इतके धान्याचे किट आणि एक वेळचं जेवणं दिलं. तर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनने आठ महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या दोन्ही महिलांची जबाबदारी घेतली. सोबतच 350 अंध बांधवांच्या कुटुंबियांना धान्याचे किट आणि सर्व बांधवांची मेडिकल तपासणी केली. यावेळी सर्वांना मोफत सॅनिटायझर, मास्क, भूक लागण्यासाठी टॉनिक देण्यात आलं. तसेच प्रत्येकाचे शारीरिक तापमान, ऑक्सिजन लेव्हल, साथीच्या आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात आले.

दिव्यांग बांधवांना मदत केल्यानंतर ' एबीपी माझा' शी बोलताना आमदार राम कदम यांनी दिव्यांग बांधवांच्या अडचणींना वाचा फोडल्यामुळे एबीपी माझाचं विशेष कौतुक केलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच पत्र लिहून अंध बांधवांसाठी या कठीण काळात ठोस उपाय योजना करण्यासाठी मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच भविष्यात काही अडचण आल्यास त्यांना मदतीसाठी सदैव तत्पर असू, असं देखील त्यांनी म्हटलं.

दिव्यांग बांधवांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने दिवसभर मेडिकल कँप राबवण्यात आला. तसेच यावेळी एबीपी माझाने ज्या दोन गर्भवती महिलांची व्यथा समोर आणली होती, त्या दोन महिलांची प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतरची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचं फाउंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात आलं. तसेच त्यांना आर्थिक मदत देखील करण्यात आली. एबीपी माझाचा इम्पॅक्ट; 350 दिव्यांग कुटुंबांना राम कदमांकडून मदतीचा हात, तर श्रीकांत शिंदे ट्रस्ट घेणार दोन्ही गर्भवती महिलांची जबाबदारी

'बायको आठ महिन्यांची पोटुशी, चार दिवस झालं गॅस संपलाय' वांगणीतील अंधबांधवांची व्यथा

यासोबतचं ऐरोली येथे राहणारे हॉटेल व्यावसायिक राहुल नाईक यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 50 अंध बांधवांना स्वतः उपस्थित राहून आर्थिक मदत केली. याबाबत बोलताना राहुल नाईक म्हणाले की, सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत अंध बांधवांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. ही बाब एबीपी माझाने समोर आणल्यानंतर मी यंदा माझा मुलगा सौरिष नाईक याच्या वाढदिवसासाठी येणारा संपूर्ण खर्च दिव्यांग बांधवांसाठी देण्याचे ठरवले. याला माझ्या पत्नीचा देखील दुजोरा मिळाला. यानंतर आम्ही आमच्या मुलाच्या हस्ते अंध बांधवांना मदत करत आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. सध्या या बांधवांना आर्थिक रक्कमेची गरज आहे. यानिमित्ताने आम्ही नागरिकांना आवाहन करतो की या बांधवांना जास्तीत जास्त मदत करा.

एबीपी माझाच्या बातमीनंतर सध्या वांगणी येथील दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आमच्या बांधवांचे लॉकडाऊनच्या काळात प्रचंड प्रमाणात हाल झाले. गावच्या सरपंचांच्या माध्यमांतून आम्हाला एक वेळ जेवणं सुरू होतं. परंतु गावामध्ये संशयित रुग्ण आढळल्यानंतर मदत बंद करण्यात आली. एकीकडे कमवण्याचे साधन बंद असल्यामुळे पोटाचे हाल तर दुसरीकडे घरातून बाहेर पडलो तर कोरोना व्हायरस होण्याची भिती होती. परंतु एबीपी माझाने आमच्या बांधवांची व्यथा दाखवली. त्यामुळे आम्हाला मोठा फायदा झाला. बांधवांना महिना दोन महिने पुरेल इतकं रेशनिंग मिळालं आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Protest Marathi News मोठी बातमी: सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget