एक्स्प्लोर

वाद टाळण्यासाठी राकेश मारियांची मुदतीपूर्वी बढती : मुख्यमंत्री

मुंबई : वाद टाळण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची मुदतीच्या काही काळ आधी उचलबांगडी केली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्याने मारियांना हटवण्यात आल्याबाबत होत असलेल्या दाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला आहे. 'त्यावेळी दोन-तीन वाद निर्माण झाले होते. ललित मोदी प्रकरणी मारियांनी दिलेलं स्पष्टीकरण आम्ही मान्य केलं. शीना बोरा हत्या प्रकरणात मारियांनी जास्त रस घेतल्यामुळे पोलिस आयुक्त या केसमध्ये इतका इंटरेस्ट का घेत आहे, असे सवाल उपस्थित झाले.' असं मुख्यमंत्री म्हणाले. 'मारियांना तपासकार्यात कुतूहल असतं, त्यामुळे हा त्यांच्या स्वभावाचा भाग असल्याचा विचार करत आम्ही इतर शक्यता फेटाळून लावल्या' पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी शीना बोरा हत्याकांडा संदर्भातल्या अनेक महत्त्वांच्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची बदली नाही, तर महासंचालकपदी बढती झाली. ठराविक कालावधीच्या काही काळ आधी एखाद्या आयुक्ताची बदली होण्यात काहीच गैर नाही, असंही ते म्हणाले. 'बढतीनंतर शीना बोरा हत्या प्रकरणात लक्ष घालण्याची मुभा मारियांना देण्यात आली होती. त्यावेळी पीटर मुखर्जींचा केसशी काहीच संबंध नसल्याचं मला सांगण्यात आलं. जोपर्यंत शीना हत्याकांडाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता, तोपर्यंत त्या पीटर मुखर्जीचा हत्येशी थेट संबंध नसल्याची माहिती मारियांकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात येत होती. मात्र कालातंरानं पीटर मुखर्जीला अटक झाली. तपासात पुढे आलेली माहिती माझ्यासाठी निश्चितच धक्कादायक होती' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एप्रिल 2012 मध्ये 24 वर्षीय शीना बोराची तिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचे पहिले पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शाम राय यांनी हत्या केल्याचा आरोप आहे. मारिया या प्रकरणाचा तपास करत असतानाच त्यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं. गणपतीसाठी बंदोबस्ताचं कारण त्यावेळी पुढे करण्यात आलं. मारियांच्या बदलीनंतर मुंबई पोलिस आयुक्तपदी अहमद जावेद यांची वर्णी लागली.

संबंधित बातम्या :

...म्हणून राकेश मारियांची मुख्यमंत्र्यांकडून उचलबांगडी?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारियांची सीबीआय चौकशी

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
Embed widget