Sharmila Thackeray: राज-उद्धव यांची गळाभेट, आदित्य-अमितचा हातात हात; शर्मिला ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sharmila Thackeray: आदित्य राज ठाकरेंच्या बाजूला; अमितला उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं या स्टेजवरील भावून क्षणांने महाराष्ट्रातील मराठी माणूस सुखावला आहे.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ). यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर राज उध्दव या भावांसोबतच त्यांची मुलं म्हणजेच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील सोबत मंचावर आल्याचं दृश्य पाहायला मिळालं. या घटनेनं राज्यातील मराठी माणूस सुखावला आहे. यावरची सर्व स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आजच्या मेळाव्यावरती राज ठाकरेंची पत्नी शर्मिला ठाकरेंनी फक्त एका ओळीतच प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, आज सगळ्या मराठी माणसांना आनंद वाटला अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally )
आदित्य आणि अमित यांनी स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, विजयी मेळावा संपल्यानंतर नेत्यांच्या भाषणानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटो काढले. यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना स्टेजवर बोलावले. यानंतर आदित्य ठाकरे काका राज ठाकरेंच्या बाजूला आणि अमित ठाकरे काका उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहिले. यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना जवळ घेतल्याचं पाहायला मिळालं.(Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally )
राज ठाकरेंचं भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी हात मिळवला
राज ठाकरेंनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतची एक आठवणही राज ठाकरेंनी सांगितली. दरम्यान, राज ठाकरेंचं भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत हात मिळवला आणि त्यांची पाठही थोपटली. ठाकरे बंधूंचा यादरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
























