एक्स्प्लोर
राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांचा सोमवारी साखरपुडा
अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेची सोमवारी म्हणजे 11 डिसेंबरला एंगेजमेंट होणार आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा उद्या साखरपुडा होणार आहे. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेची सोमवारी म्हणजे 11 डिसेंबरला एंगेजमेंट होणार आहे. कृष्णकुंज या निवासस्थानावर घरगुती पद्धतीनं हा साखरपुडा होईल. मिताली फॅशन डिझायनर असल्याची माहिती आहे, तर अमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि आता लवकरच विवाहबंधनात होणार आहे. विशेष म्हणजे, उद्या राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा केला जाणार आहे. या सोहळ्याला कोण-कोण उपस्थित राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाहा फोटो :
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा ठरला
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली






















