एक्स्प्लोर

झेपत नसेल तर सत्तेतून पायऊतार व्हा, मराठा मोर्चावरुन राज ठाकरेंचा इशारा

झेपत नसेल तर सत्तेतून पायऊतार व्हा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

मुंबई: झेपत नसेल तर सत्तेतून पायऊतार व्हा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.  मराठा आरक्षण कसं असेल, कायद्याच्या कोणत्या चौकटीत दिलं जाईल, अशा सर्व बाबींवर भूमिका मांडा, नाहीतर उगाच आशा लावून लोकांचे जीव घेऊ नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी सरकारला केलं आहे. तसंच मराठा आंदोलकांनाही शांततेचं आवाहन करत आपला अमूल्य जीव धोक्यात घालू नका, असंही राज यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे काय म्हणाले? मराठा मूक-क्रांती मोर्चाचं ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केलं होतं. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असंही म्हटलं होतं. काल मात्र काकासाहेब शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडलं. अर्थात असं असलं तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की यापुढे एकाही 'मराठी', मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल,कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला 'मराठी' म्हणून ते परवडणारे नाही. एक लक्षात घ्या, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला, मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक "मराठा समाज" म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती, आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीनं करायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाच्या घरी त्याची वाट पाहणारी आई वडील, बायको-मुलं आहेत. त्यांचा विचार मनात असू द्या. जातीपातीच्या नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या आणि आपला खरा शत्रू ओळखा. आपल्यावर संकट आहे ते बाहेरून. जी बाहेरची माणसं महाराष्ट्राकडे फक्त लुटायचं केंद्र म्हणून पाहातात त्यांच्याकडून. आपले शिवाजी महाराज म्हणाले होते की “हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा”, आता सध्याची परिस्थिती पाहिली की वाटतं: “आपण जातीजातीत भांडत रहावे, ही तो परप्रांतीयांची इच्छा”. त्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातील प्रत्येकाची साथ हवी आहे. हो, प्रत्येकाची ! आणि म्हणून उगाच जीवाचं बरंवाईट करून घेऊ नका. ह्याचवेळी सरकारला एक इशारा. सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचं आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात. नाहीतर आमची मुलं उगाच आशा लावून बसायची आणि हकनाक बळी जायची. दुसरं असं की सरकारला  "शांतता आणि सुव्यवस्था" सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसतं आहे. त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष आहेत. आता पुन्हा काही आश्वासनं देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचं कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे. वास्तविक प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम? ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये.

महत्त्वाच्या बातम्या

सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Pujya Gurudevshri Rakeshji : मुंबईत जन्म, मुंबईतच षष्ठ्यब्दीपूर्ती! पूज्य गुरुदेवश्री राकेशजींच्या 'अहो गुरुदेव' सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी
मुंबईत जन्म, मुंबईतच षष्ठ्यब्दीपूर्ती! पूज्य गुरुदेवश्री राकेशजींच्या 'अहो गुरुदेव' सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Embed widget