एक्स्प्लोर

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

28 ऑक्टोबरला मुंबईतील मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि इतर कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात सुशांत माळवदे हे जबर जखमी झाले. आधीपासूनच फेरीवाल्यांविरोधात सुरु असलेल्या मनसेच्या आंदोलनाने यानंतर मात्र आक्रमक रुप धारण केले.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे 'वर्षा' बंगल्यावर जातील. या भेटीत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करतील. 28 ऑक्टोबरला मुंबईतील मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि इतर कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात सुशांत माळवदे हे जबर जखमी झाले. आधीपासूनच फेरीवाल्यांविरोधात सुरु असलेल्या मनसेच्या आंदोलनाने यानंतर मात्र आक्रमक रुप धारण केले. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधातील आपलं आंदोलन आणखी तीव्र केले. मुंबई असो वा नवी मुंबई किंवा ठाणे, या प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलनं केली. यामध्ये अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावलंही उचलली. एकंदरीतच फेरीवाला आंदोलनाने गेल्या काही दिवसात मोठं रुप धारण केलं आहे. मनसेच्या आंदोलनानंतर मुंबईतील अनेक रस्त्यांनी, रेल्वे स्थानकांबाहेरील जागांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे मनसेच्या आंदोलनांना पाठिंबाही वाढत गेला. त्यात काल  (1 नोव्हेंबर) काँग्रेसने फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेऊन मोर्चा रोखला. मात्र त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही काँग्रेस कार्यकर्त्यांना भिडले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला होता. एकंदरीत गेल्या काही दिवसात फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेलाही मोठा जनाधार मिळू लागला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आज फेरीवाल्यांचा प्रश्न मांडणार आहेत. या भेटीत नक्की काय होतं आणि या भेटीनंतर राज ठाकरे मनसेची काय भूमिका जाहीर करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या : फेरीवाल्यांसाठी हायकोर्टात दाद मागणाऱ्या निरुपम यांना दणका दादरमध्ये काँग्रेस आणि मनसे कार्यकर्ते भिडले! फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा दादरमध्ये मोर्चा काँग्रेस फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार! जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेट  … तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला  फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं? नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा

महत्त्वाच्या बातम्या

Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
Maharashtra Goverment On Student Protest: महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget