एक्स्प्लोर

Raj Thackeray : भाजपचा राज ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलानाचा इशारा, मनसे कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली, माहिममध्ये भाजप-मनसेचा राडा

BJP MNS Rada : भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद केले असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसोबत लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी हटवल्यानंतर आता मनसे आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे. अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजपच्या युवा मोर्चाने त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानासमोर आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमल्याचं दिसून आलं. राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली असून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आव्हानही दिलं आहे. 

त्याचवेळी माहिमध्ये भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक पोहोचल्यानंतर त्यांनी अमित ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी मनसेचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी आल्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. 

पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे पोहोचले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेले असता त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचं दिसून आलं. मोदींचा फोटो शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत कशाला असा प्रश्न अमित ठाकरे यांनी विचारला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो हटवला. या प्रकरणानंतर अमित ठाकरे आणि मनसेच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

भाजपचा आंदोलनाचा इशारा

अमित ठाकरेंच्या या कृत्यानंतर भाजप युवा मोर्चा त्यांच्याविरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थांनी आंदोलन करण्याची घोषणा दिली. त्यानंतर मनसेचे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनीही राज ठाकरे यांच्या निवासस्थांनी धाव घेतली. 

मनसे नेते संदीप देशपांडे, गजानन काळे आणि अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थांनी पोहोचले आणि त्यांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यावं, आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, असं संदीप देशपांडे म्हणाले. 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दरम्यान, या ठिकाणी मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची वाहतूक बंद करण्यात आली आहे, त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. 

त्याचवेळी माहिममध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असं सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अमित ठाकरे यांनी माहिममधून गेल्या वेळची विधानसभा निवडणूक लढवली होती. 

नेमकं काय प्रकरण? 

पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे हे गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा लावल्याचं आढळलं. त्यावर मोंदींचा फोटो या ठिकाणी कशाला असा सवाल अमित ठाकरे यांनी मुख्याध्यापकांना विचारला. त्यानंतर मनसेच्या प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून काढला. 

या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे मनसे कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कार्तिकी एकादशीनिमित्त ST च्या एक हजार बसेस सज्ज, एसटीच्या सेवेला प्रथम प्राधान्य द्या, मंत्री सरनाईकांचं आवाहन
वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कार्तिकी एकादशीनिमित्त ST च्या एक हजार बसेस सज्ज, एसटीच्या सेवेला प्रथम प्राधान्य द्या, मंत्री सरनाईकांचं आवाहन
Tiger Shroff Attack Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाइंड अनिल पंडितचा फरार भावाविरोधात पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी, अभिषेक पंडित अद्याप फरारच!
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाइंड अनिल पंडितचा फरार भावाविरोधात पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी, अभिषेक पंडित अद्याप फरारच!
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Embed widget