ते म्हणाले की, मला राजकारण बटबटीत वाटतं. मी अपघाताने राजकारणात आलो. राजकारणाचा अर्थ निवडणुकांच्या पलीकडे आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. फडणवीस हे साडे तीन शहाण्यांपैकी एक होते, असं ते म्हणाले. तर पंडित नेहरु हा माणूस मोठा होता. त्य चांगल्या इन्स्टिट्यूट उभ्या केल्या, असं राज ठाकरे म्हणाले.
मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न
राज ठाकरे म्हणाले की, मी एका दैनिकात काम करत होतो. मात्र एके दिवशी मला संपादकांनी सांगितलं की, पवार साहेबांवर व्यंगचित्र काढायचं नाही. असं सांगितल्यावर मी त्याच दिवशी नोकरी सोडली, असं ते म्हणाले. मला निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळी बरं वाटलं. कारण पक्षांतर करणाऱ्या अनेकांना लोकांनी धडा शिकवला, असंही ते म्हणाले.
परदेशातल्या गोष्टी महाराष्ट्रात आल्या पाहिजेत, असं ते म्हणाले. आपण राजकारणात मुलांना आणू शकतो, पण समोर असलेल्या लोकांनी स्वीकारले पाहिजे. त्यांना आपण लोकांवर लादू शकत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
बीकेसी उभे राहिले तेव्हा एक रचना केली गेली. मग तेव्हा तिथे शिवाजी पार्क सारखे मैदान का उभे नाही करू शकले, असंही राज ठाकरे म्हणाले. 14 वर्षात अख्खं रामायण घडलं. आपल्याकडं मात्र केवळ 14 वर्षात बांद्रा-वरळी सी लिंक बांधला गेला, अशी खोचक टीका त्यांनी केली.