महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 15 Feb 2020 04:43 PM (IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना खडसावल्याचे पाहायला मिळाले. काही कार्यकर्ते चुकीच्या बातम्या देत असून त्यांची हकालपट्टी करणार असल्याचे राज म्हणाले.
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार आहेत. ते चुकीच्या बातम्या देतात. अशांना पक्षात स्थान नाही. त्यांची हकालपट्टी करणार आहे, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. राज ठाकरे दोन दिवसांपासून औरंगाबादमध्ये पक्ष बांधणीसाठी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मी इथे पक्षाच्या बैठकीला आलोय, कार्यर्त्यांसोबत संवाद साधला, आपल्याला जोरात काम करायचं आहे, काही लोक चुकीच्या बातम्या देत आहेत, आपले कार्यकर्तेच गद्दार आहेत, त्यांची नाव मला कळली आहेत, गद्दारांना पक्षात जागा नाही. त्यांची हकालपट्टी मी करणार आहे, दोन दिवसात त्यांना हकालणार, बांगलादेशी घुसखोरांसाठी मी आंदोलन केले. मात्र, आता अफगाणी घुसखोर सापडले आहे. परिस्थिती गंभीर आहे, मी 15 दिवसांनी पुन्हा येईल तेव्हा सविस्तर बोलेल, आता मला जाण्याची रजा द्यावी, असं राज ठाकरे यांनी सांगितले. भूमिका बदलून काहीजण सत्तेत बसले, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला; तर औरंगाबादच्या नामांतरालाही पाठिंबा मला हिंदू जननायक म्हणू नका : राज ठाकरे पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मुंबईत मनसेने महामोर्चा काढला होता. या मोर्चानंतर राज ठाकरे यांना 'हिंदू जननायक' असं म्हटलं जाऊ लागलं होतं. मात्र, मला हिंदू जननायक म्हणू नका असं राज ठाकरेंनी सर्वांना सांगितलं. यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. मनसेच्या मोर्चावर शरद पवारांनी टीक केली होती. त्याविषयी बोलताना राज ठाकरेंनी म्हटलं की, शरद पवार आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. राजकारणाच्या पलिकडे संबंध जपले जातात, महाराष्ट्राची तशी राजकीय परंपरा आहे. मनसेकडून औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर'; महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी? झेंडा बदलला, भूमिका कायम मनसेच्या बदलेला झेंडा आणि बदलेल्या भूमिकेविषयी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, मी माझ्या पक्षाचा केवळ झेंडा बदलला आहे. पक्षाची भूमिका आधी जी होती तीच कायम आहे. जे पक्ष आज स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेत आहेत, त्यांनी कधी भूमिका घेतली का? त्यांना तुम्ही विचारलं का? असा सवाल राज ठाकरे विचारला. नव्या झेंड्याबाबात कोणतीही नोटीस आली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. Raj Thackeray | मनसेचे काही कार्यकर्ते गद्दार आहेत, ते चुकीच्या बातम्या देतात : राज ठाकरे | ABP Majha