एक्स्प्लोर

बाबासाहेब पुरंदरेंना पोलीस संरक्षणात फिरावं लागणं दुर्देव : राज ठाकरे

ज्यांनी पूर्ण हयात शिवव्याख्यानं आणि शिवचरित्र लिहिण्यात घालवली, त्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागणं, हे दुर्दैव असल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.

मुंबई : ज्यांनी पूर्ण हयात शिवव्याख्यानं आणि शिवचरित्र लिहिण्यात घालवली, त्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागणं, हे दुर्दैव असल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. मुंबईत आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्त 'शिवशाहीर सन्मान सोहळा' पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. विलेपार्लेमधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रभूषण सन्मानावरुन झालेल्या वादावरही पुन्हा एकदा भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, ''शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवणारे बाबासाहेब हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. अनेकांनी महाराजांचा इतिहास सांगितला. पण बाबासाहेबांनी ज्या महाराजांचा इतिहास सांगितला, ते विलक्षण आहे.'' बाबासाहेबांच्या टीकाकारांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की, ''काही जणांकडून बाबासाहेबांचा उल्लेख श्रीमंत म्हणून केला जातो. पण राजकारणामध्ये येऊन श्रीमंत झालेले व्यक्ती बाबासाहेबांवर बोटं उगारत आहेत. पण बाबासाहेबांनी मांडलेल्या इतिहासातील आक्षेपांवर चर्चा करायला कुणीही पुढे येत नाही. कारण त्यांना  जातीपातीची लेबलं लावून फक्त आरोप करायचे आहेत. '' बाबासाहेबांना पोलीस संरक्षणात फिरावं लागतं, यावर खंत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, ''बाबासाहेबांचा एकीकडे महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरव होतो. त्याच बाबासाहेबांनी शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. त्यांना पोलीस संरक्षणात महाराष्ट्रात फिरावं लागतं, यासारखं दुर्दैव नाही.'' शिवचरित्रासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी घेतलेल्या कष्टाचा गौरव करताना राज ठाकरे म्हणाले की, ''महाराजांच्या इतिहासाबद्दल बाहेरच्यांनी (इतर देशातील इतिहासकारांनी) जे लिहून ठेवलंय, त्यावर अध्ययन करुन, एक सोपा इतिहास महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला. महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी बाबासाहेबांशिवाय इतर कोणीही तसे प्रयत्न केले नाहीत. त्यांना ते प्रयत्न करायचे नाहीत. त्यांना केवळ आरोप करायचे असल्याचं त्यांनी सांगितंल. किल्ले रायगडवर घेतलेल्या मुलाखतीचा संदर्भ देऊन राज ठाकरे पुढे म्हणाले की, ''बाबासाहेबांना त्या मुलाखतीत मी एक प्रश्न विचारला होता की, महाराजांचा 50 वर्षांचा इतिहास लिहावा वाटला. पण पेशव्यांचा 125 वर्षांचा इतिहास लिहावा वाटला नाही, या मागचं कारण काय?'  त्यावर बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं, त्यासाठी मोठी हिंमत असण्याची गरज आहे. कारण बाबासाहेब म्हणाले होते की, 'पेशव्यांनी केलेल्या चुका महाराष्ट्राला सांगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी करुन ठेवलेल्या अचूक गोष्टी महाराष्ट्राला सांगव्यात असं मला वाटतं.' अशा माणसाभोवती जातीपातीची भूतं नाचवताय तुम्ही, यासारखं दुर्दैवं कोणतंही नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Navnath ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे
तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
Mumbai Art Gallery : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे भव्य दालन उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे भव्य दालन उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Sanjay Gaikwad: शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम'? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
Navnath Ban and Nilesh Rane: अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
IND vs NZ 4th T20I : तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
Embed widget