एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेट
राज ठाकरेंसोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरेही आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मालाडचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी राज ठाकरेंसोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरेही उपस्थित होता.
मुंबईतील मालाडचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि काही कार्यकर्ते हे काल (28 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावाने सुशांत माळवदे आणि त्यांच्या सोबतच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला.
फेरीवाल्यांच्या या जीवघेण्या हल्ल्यात माळवदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. सुशांत माळवदे यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना कांदिवलीच्या ऑस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल
विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे. काल संध्याकाळी मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं आहे. संजय निरुपमांनी हल्लेखोर फेरीवाल्यांनी चिथावल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आज त्याची दखल घेत संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल केला.
सात फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबईतल्या मालाड भागात मनसे कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल मालाडमध्ये मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना काही फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली.
काय आहे प्रकरण?
मालाडमध्ये फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना उपचारासाठी कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
काल मालाडमध्ये फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना जबर मारहाण केली होती. या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातो आहे. काँग्रेसच्या संजय निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.
संबंधित बातम्या :
जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर
नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा
फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?
मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड
मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement