एक्स्प्लोर

बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, राज ठाकरेंचं आवाहन

"बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान आहे."

वसई : बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसई आणि पालघरमधील नागरिकांना केले. तसचे, जबरदस्तीनं जमिनी घेतल्यास बुलेट ट्रेनचे रुळ उखडून टाकू, अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदी सरकारला खुलं आव्हान दिलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातून केली. या दौऱ्यातील पहिली आणि एकमेव सभा वसईत झाली. ऑगस्ट महिन्यापर्यंत राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करुन पक्षबांधणी करणार आहेत. आजच्या भाषणात राज ठाकरेंनी मोदी सरकारला चहुबाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. डिजिटल इंडिया, स्थानिक रोजगार, नाणार अशा अनेक विषयांना यावेळी त्यांनी हात घातला. राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन आणि मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेस वेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान आहे. बुलेट ट्रेनच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जमिनी बळकावायच्या आणि 1960 साली जी मुंबई महाराष्ट्राला दीर्घ लढाईने मिळवली तिचा ताबा घ्यायचा हा यांचा डाव आहे." "नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना अजून देखील गुजरात आठवतो. जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरू शकत नाही तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा?" असा सवालही राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : - पालघरमधून सुरु झालेला दौरा ऑगस्टपर्यंत संपेल, आजची सभा एकमेव जाहीर सभा - राज ठाकरे - देशात विषयांची कमतरता नाहीच, विषयांचे पुरवठामंत्री खूप आहेत - राज ठाकरे - महाराष्ट्राची आजची अवस्था मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे - राज ठाकरे - मराठी शाळा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला, काय सरकार आहे! - राज ठाकरे - नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत, भारताचे नाहीत - राज ठाकरे - बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान - राज ठाकरे - जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरु शकत नाहीत, तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा? - राज ठाकरे - मोदी म्हणतात, आमच्यामुळे वीज आली, मग 2014 आधी आम्ही अंधारात होतो का? - राज ठाकरे - फडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं - राज ठाकरे - महाराष्ट्राचं वाळवंटीकरण होत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतायेत, एक लाख विहिरी बांधल्या - राज ठाकरे - नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावे, असे म्हणणारा या देशातील पहिला माणूस मी होतो - राज ठाकरे - मोदींएवढा माणूसघाण्या माणूस बघितला नाही - राज ठाकरे - नोटा छापायच्याच होत्या, तर कॅशलेस इंडिया हे काय प्रकरण आहे? - राज ठाकरे - मराठी मुसलमान राहतो, तिथे दंगली होत नाहीत - राज ठाकरे - हे राज्य एकदा राज ठाकरेच्या हातात देऊ बघा - राज ठाकरे VIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण :

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget