एक्स्प्लोर
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला कोर्टानं खडसावलं!

भिवंडी: तक्रारदाराला धमकावल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यानं माफीनामा सादर करावा असे आदेश ठाणे सत्र न्यायालयानं दिले आहेत. भिवंडीतील रवी भालोरिया या व्यापाऱ्यानं शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या बेस्ट डील या कंपनीविरोधात 23 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुनावणी सुरु असताना राज कुंद्रा यानं तक्रारदाराला 100 कोटी तयार ठेव. अशा शब्दात धमकावलं. तक्रारदारानं ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर उद्या सुनावणीला येताना हमीपत्र आणि माफीनामा घेऊन या. असे आदेश राज कुंद्राला देण्यात आले.
Before You Go
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?






















