एक्स्प्लोर

मुंबई उपनगरांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग

पालघर : गेल्या 24 तासात पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह चांगलाच पाऊस झाला आहे. रात्रभरापासून बरसलेल्या संततधार पावसामुळं नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. तर सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईसह भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आदी भागांमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. पालघरमध्ये तुफान पाऊस पालघरमधल्या विक्रमगडमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 324 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर इथल्याच तलासरी तालुक्यात तब्बल 468 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसानं सगळीकडं पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं असून, आज पहाटे 4 वाजल्यापासून इथली वाहतूक ठप्प आहे. तर गेल्या 20 तासापासून विक्रमगड परिसरातला वीजपुरवठा खंडीत झाला आहे. भिवंडीतही पावसाची रिपरिप भिवंडीतही रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. दमदार पावसामुळं रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. अजूनही भिवंडीत काही परिसरात रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे नाल्यातलं पाणी रस्त्यावर आलं आहे. यातून मार्ग काढताना भिवंडीकरांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अंबरनाथमध्ये संततधार पावसानं नगरपालिकेच्या कामांचा धुव्वा दुसरीकडं अंबरनाथमध्ये रात्रभरापासून चांगलाच पाऊस कोसळतो आहे. मोठ्या विश्रांतीनंतर काल रात्री इथं पावसानं हजेरी लावली. पावसाच्या संततधारेमुळं बीकेबिन परिसरात पाणी साचलं होतं. त्यामुळं नपानं केलेल्या कामांचा धुव्वा उडाला. उल्हासनगर आणि नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग याशिवाय उल्हासनगरमध्ये पावसानं चांगलीच बॅटिंग केली. मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी वाहतूक धीम्या गतीनं सुरु होती. नवी मुंबईतही रात्रभरापासून वरुणराजा बरसतो आहे. रात्री इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सकाळीही जोरदार पाऊस सुरु होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 
धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द
Maharashtra Live Blog Updates: ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
Embed widget