एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत 16 डब्यांची रेल्वे धक्का देऊन प्लॅटफॉर्मला आणली!
मुंबई सेंट्रल स्टेशनववर चक्क एका रेल्वेला धक्का मारत ट्रॅकवर आणण्यात आल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : आतापर्यंत तुम्ही दुचाकी, चारचाकी अथवा एखाद्या मोठ्या वाहनाला धक्का देऊन सुरु करताना बघितलं असेल. मात्र मुंबई सेंट्रल स्टेशनववर चक्क एका रेल्वेला धक्का मारत ट्रॅकवर आणण्यात आल्याचं समोर आलं आहे.
मुंबई सेंट्रल- लखनऊ ही 16 डब्यांची एक्स्प्रेस सिग्नल पार करून डेड-ऐंडच्या पुढे गेली. ही गाडी पुन्हा प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी रेल्वे इंजिनचा वापर करता येणं शक्य नव्हतं. कारण गाडीचे इंजिन ओव्हरहेड वायर नसलेल्या ठिकाणी पोहचले होतं.
त्यामुळे गाडीला धक्का देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. अखेर ही गाडी पुन्हा पटरीवर आणण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या डिव्हिजनल मॅनेजर मुकूल जैन यांनी एक शक्कल लढवली. गाडी ढकलण्यासाठी त्यांनी आपल्या आपल्या कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. अखेर 40 कर्मचाऱ्यांनी धक्का मारत या रेल्वेला पुन्हा ट्रॅकवर आणलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement