एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राममंदिर स्टेशन उद्घाटनाच्या कार्यक्रमात घोषणाबाजी
मुंबई : मुंबईतील राममंदिर स्टेशन उद्घाटनाच्या कार्यक्रमात भाजप, शिवसेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या नावच्या घोषणा देण्यात आल्या, तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणाबाजी करण्यात आली.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या नव्या स्टेशनचं उद्घाटन करण्यात येणार आहे. व्यासपीठावर शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, रविंद्र वायकर यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती आहे. कार्यकर्त्यांकडून व्यासपीठाजवळ घोषणाबाजी करण्यात आली.
राम मंदिर या स्थानकाच्या नावावरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. आधी ओशिवरा असं या स्थानकाचं नाव असेल अशी माहिती मिळाली. मात्र काही दिवसांपूर्वी या स्थानकाचं नाव राम मंदिर ठेवून त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही सरकारकडून निश्चित करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement