एक्स्प्लोर

जुहूतील चौकाला श्रद्धा कपूरच्या आजोबांचं नाव !

मुंबई : जुहू स्कीम परिसरात गुलमोहर क्रॉस चौकाचं नामकरण ‘पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे चौक’ असं करण्यात आलं. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नामकरण पार पडलं. पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूरचे आजोबा होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेते जॅकी श्रॉफ, जितेंद्र, शक्ती कपूर यांनी हजेरी लावली. पंडित पंढरीनाथ कोल्हापुरेंचा अल्पपरिचय : पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे ( 16 फेब्रुवारी 1930 – 15 ऑगस्ट 2015) हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते. पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते. पंढरीनाथ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीणा वरदायिनी ही संस्था सुरू केली होती. वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी मधुसूदन जोशी आणि खाँसाहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. बी.आर. देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार गंधर्व भेटले. आधी गुरुबंधू असणारे कुमार नंतर गुरूही झाले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी फलटण गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला.   पंढरीनाथ कोल्हापुरेंचं कुटुंब शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली आहेत. पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. तर शिवांगी कोल्हापुरे या गायिका आहेत. हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे शिवांगी यांचे पती आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2026 | मंगळवार
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
काळे धंदे लपवण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेऊ नका, उद्धव ठाकरेंमुळंच मी विधानपरिषदेचा राजीनामा दिला, पावसकरांचा हल्लाबोल
काळे धंदे लपवण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेऊ नका, उद्धव ठाकरेंमुळंच मी विधानपरिषदेचा राजीनामा दिला, पावसकरांचा हल्लाबोल
विधानसभा अध्यक्षपदाला साजेसा अभ्यास आणि भाषेवर प्रभुत्व हवं, यापेक्षा दुसरी-तिसरीतील मुलंही चांगलं वाचन करतात, दमानियांचा नार्वेकरांना टोला 
विधानसभा अध्यक्षपदाला साजेसा अभ्यास आणि भाषेवर प्रभुत्व हवं, यापेक्षा दुसरी-तिसरीतील मुलंही चांगलं वाचन करतात, दमानियांचा नार्वेकरांना टोला 

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम
Maharashtra Monsoon Session 2026: 'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात अन् पळून जातात', आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला, एकनाथ शिंदेंचेही जशास तसं प्रत्युत्तर; विधानसभेत नेमकं काय घडलं?
'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात अन् पळून जातात', आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला, एकनाथ शिंदेंचेही जशास तसं प्रत्युत्तर; विधानसभेत नेमकं काय घडलं?
Operation Tiger Rajool Patil: खासदार फुटले, आता महापालिकेत काय होणार? राजुल पाटील बाहेर पडल्या तर....यशवंत किल्लेदार यांनी स्पष्टच सांगितलं!
खासदार फुटले, आता महापालिकेत काय होणार? राजुल पाटील बाहेर पडल्या तर....यशवंत किल्लेदार यांनी स्पष्टच सांगितलं!
Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026: सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरुन महायुतीत वादाची ठिणगी, जयकुमार गोरेंच्या निशाण्यावर शंभूराज देसाई
सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरुन महायुतीत वादाची ठिणगी, जयकुमार गोरेंच्या निशाण्यावर शंभूराज देसाई
Raj Thackeray: राहुल नार्वेकरांनी 'त्या' कागदातून भेळ खाल्ली होती का? आशाताईंच्या निधन शोकप्रस्ताव वाचनावरुन संतापले राज ठाकरे
राहुल नार्वेकरांनी 'त्या' कागदातून भेळ खाल्ली होती का? आशाताईंच्या निधन शोकप्रस्ताव वाचनावरुन संतापले राज ठाकरे
Embed widget