मुंबई : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देणाऱ्या राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पिण्याच्या मोहीमे बाबतीत मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईतील महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिलं जातं का? असा सवाल गुरूवारी (13 फेब्रुवारी) मुंबई न्यायालयानं उपस्थित केला आहे. यामुळे या प्रशासकीय मोहिमेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने ही मोहीम गांभीर्यानं सुरू करावी असा संदेश हायकोर्टानं दिला आहे.

शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य उत्तम राहावं या हेतूनं हा उपक्रम सुरु केला आहे. मुलांनी भरपूर पाणी प्यावे हा यामागचा मूळ उद्देश आहे. पण मुंबई महानगरपालिका शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पुरविले जाते का? असा प्रश्न हायकोर्टानं विचारला. अनेक पालिका शाळांमध्ये नळानेचे पाणी पुरविले जाते तर काही ठिकाणी तेही उपलब्ध नसते, असा आरोप करत जनहित मंचच्यावतीनं हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महापालिका शाळांमध्ये असलेल्या अपुऱ्या सोयी सुविधांबाबत न्यायालयात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. गुरूवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
Water Bell | नळाला पाणी आल्यावर आलार्म वाजणार, भांडुपमधील दोघा विद्यार्थ्यांचा प्रयोग | ABP Majha


मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नुकत्याच जारी केलेल्या एका परिपत्रक नुसार प्राथमिक शाळेत तीन वेळा विशेष घंटा वाजवून मुलांना पाणी पिण्यासाठी खास वेळ देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वजन, उंची, वयानुसार मुलांनी रोज दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मुलांचा दिवसातील पाच ते सात तासांचा कालावधी शाळेत जातो. या कालावधीत शरीराला पाण्याची अनेकदा गरज असूनही अभ्यास, खेळ यामुळे अनेक विद्यार्थी पाणीच पित नाहीत. अनेक लहान मुले सकाळी घरातून नेलेले पाणी पुन्हा घरी घेऊन येतात. आपली मुले शाळेत पाणी पीत नसल्याच्या अनेक तक्रारी पालक नेहमी करत असल्याचे अनेक सर्वेक्षणातूनही समोर आले आहे.

मुख्याध्यापकांनी शाळेच्या वेळापत्रकात वॉटर बेलसाठी वेळनिश्चिती केल्यानंतर पाणी पिण्याची मुलांची मानसिकता आपोआपच निर्माण होईल आणि पुढे तिचं सवयीत रुपांतरही होईल. अनेकदा वर्ग सुरु झाल्यानंतर शिक्षक स्वच्छतागृहात पाठवत नसल्याने विद्यार्थी पाणी पित नसल्याचे समोर आलं आहे.


संबंधित बातम्या :