मुंबई : मुंबईत अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरात रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. सुदैवाने आगीत कोणीही अडकलेलं नाही. अग्निशमन दलाच्या अठरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. इमारतीमध्ये व्हेंटिलेशन नसल्याने अडीच ते तीन तासांपासून आग धुमसतीच आहे. धुराचे लोट आणि आगीची तीव्रता यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहे.


खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. आग लागलेल्या इमारतीत कोणीही अडकलेलं नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.