एक्स्प्लोर
Advertisement
खासगी मेडिकल कॉलेज प्रवेशाचा तिढा सुटला
खासगी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाचा तिढा सोडवण्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना यश आलं आहे.
मुंबई : खासगी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाचा तिढा सोडवण्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना यश आलं आहे. त्यामुळं खासगी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाची यादी उद्या (मंगळवारी) जाहीर होणार आहे.
यासंदर्भात आज खाजगी संस्थाचालक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांमध्ये बैठक झाली. त्यात तोडगा निघाला आहे. खाजगी महाविद्यालयाच्या शुल्काबद्दल वाद आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण शुल्क समितीसोबत संस्थाचालकांची बैठक होणार आहे. त्यात शुल्क वाढीबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यातल्या जवळपास 40 मेडिकल आणि डेन्टल कॉलेजेसनी वार्षिक फीमध्ये वाढ करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यावरुनच हा वाद सुरु होता. अखेर यावर तोडगा निघाल्यानं विद्यार्थ्यांच्या जीव भांड्यात पडला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion