एक्स्प्लोर

मुंबईतील खासगी बस चालकांचा संपाचा इशारा

मुंबईत खासगी बससेवा पुरवणाऱ्या बस चालक-मालकांनी 19 आणि 20 तारखेला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई : मुंबईत खासगी बससेवा पुरवणाऱ्या बस चालक-मालकांनी 19 आणि 20 तारखेला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनं आणि खासगी बस सेवा बंदी घालण्यात आली होती. यानंतर खासगी बस चालक-मालकांना पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पोलीस आयुक्तांनी आम्ही लवकरच ही बंदी उठवू असं आश्वासन दिलं.  मेट्रोची कामं, रस्ते दुरुस्ती यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर सध्या मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मुंबईतील रोजच्या वाहतूक  कोंडीवर मार्ग काढण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सूचना मागवल्या. हीच संधी साधून 12 सप्टेंबरला वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्क्युलरवजा फतवा काढला. त्यानुसार सकाळी सात ते दुपारी 11 वाजेपर्यंत अवजड वाहनं, प्रवासी बसेसना मुंबईत प्रवेश मिळणार नाही. शाळेच्या बसेस आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसना रस्त्यालगत पार्किंग करता येणार नाही. मुंबईतून निघणाऱ्या बसेसना रात्री 9 च्या आधी शहरातून प्रवाशांसह बाहेर निघता येणार नाही. मुंबईत परत येताना सकाळी 7च्या आत मुंबईत यावं लागेल, नाहीतर प्रवाशांना मुंबईबाहेर सोडावं लागेल. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांना अशी कारवाई सुरु असल्याची किंचितही कल्पना नव्हती. त्यामुळे बस मालक संघटना आणि पोलिसांच्या बैठकीत अमितेश कुमार यांची चांगलीच अडचण झाली.  पण या खेळात बसचालक आणि प्रवाशी भरडले जात आहे. बस मालक संघटनेनं हा फतवा मागे घेण्यासाठी 24 तासाचा वेळ दिला आहे. नाहीतर 19 तारखेपासून दोन दिवसाच्या संपाची घोषणा केली आहे. मुंबईत 25 लाखापेक्षा जास्त वाहनं आहेत. दुचाकी आणि जड वाहनांची संख्या वेगळी. त्यात कुलाब्यापासून ते अंधेरीपर्यंत सगळीकडे मेट्रोची कामं सुरु आहेत. खड्ड्यांनी प्रवास आणखी अवघड केला आहे. पण त्यावर असा तुघलकी फतवा औषध कसा काय असू शकतो?

महत्त्वाच्या बातम्या

Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Embed widget