मुंबई : बीएस-3 म्हणजेच भारत स्टेज 3 इंजिनवर सुप्रीम कोर्टानं बंदी आणल्यानंतर ऑटोमोबाईल कंपन्यांनी बंपर सूट दिली. यामुळे गेल्या दोन दिवसात राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी झाली. ऑटोमोबाईल कंपन्यांच्या या बंपर सवलतीमुळे राज्याच्या तिजोरीत दोन दिवसात 100 कोटीहून जास्त महसूल गोळा होणार आहे.
वास्तविक, एका दिवसात गाड्यांच्या व्यवहारातून सरकारला 20 ते 25 कोटींचा महसूल मिळतो. मात्र गेल्या 2 दिवसातील ऑटोमोबाईल कंपन्यांकडून देण्यात आलेल्या बंपर सवलतीमुळे सरकारकडे तब्बल 100 कोटींहून अधिक महसूल मिळाल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. मात्र, दुसरीकडे यामुळे आरटीओचा ताणही चांगलाच वाढला असल्याचंही त्यांनी मान्य केलंय.
सध्या दर दिवशी 7 ते 8 हजार गाड्यांची विक्री होते. यातून राज्य सरकारकडे 20 ते 25 कोटींचा महसूल जमा होतो. पण गेल्या दोन दिवसात बीएस-3 वाहनांची विक्रमी खरेदी झाली. 30 तारखेला 14 हजार पाचशे वाहनांसाठी नोंदणी झाली होती. तर 31 तारखेला 25 हजार गाड्यांची नोंदणी झाल्याची माहिती गेडाम यांनी दिली
गाड्यांच्या या विक्रमी खरेदीतून तब्बल 100 कोटीहून जास्त महसूल राज्य सरकारकडे जमा होण्याची शक्यताही गेडाम यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसातील बंपर खरेदी व्यवहारांमुळे राज्यातील जवळपास सर्वच शोरुममधून बीएस-3 इंजिनच्या गाड्या आऊट ऑफ स्टॉक झाल्या होत्या. त्यामुळे त्यावरच्या पुढील नोंदणीच्या प्रक्रियेचा ताण आता वाहतूक शाखेवर असणार आहे.
संबंधित बातम्या
वाहन कंपन्यांच्या बंपर सूटमुळे वाहन खरेदीत वाढ!
बंपर ऑफरनंतर अनेक शोरुममध्ये दुचाकी ‘आऊट ऑफ स्टॉक’!
BS-III इंजिनच्या गाड्या भंगारात, खरेदी-विक्रीला बंदी : सुप्रीम कोर्
होंडाच्या टू व्हीलरवर 18 हजारांची सूट, गाड्या खपवण्यासाठी धावाधाव