एक्स्प्लोर
Advertisement
प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोळेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटक
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चांदोळे टॉप्स ग्रुपचे भागीदार असल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक केली आहे.
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चांदोळे टॉप्स ग्रुपचे भागीदार असल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक केली आहे. ‘टॉप्स सिक्युरिटी’ या ग्रुपविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. आता अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 12 तासांच्या चौकशीनंतर अमित चांदोळे यांना अटक करण्यात आली आहे. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय समजले जातात.
EXCLUSIVE Pratap Sarnaik |माझं तोंड ईडी बंद करू शकणार नाही;फाशी द्या मात्र मी बोलणारच :प्रताप सरनाईक
मंगळवारी ईडीने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयानं शोधमोहिम केली होती. टॉप्य ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली होती. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.
राजकीय विरोधकांविरोधात तपास यंत्रणांचा वापर, सरनाईक प्रकरणावर शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा
प्रताप सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर ईडीकडून छापे मारले होते. या कारवाईवेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. माझं तोंड ईडी बंद करू शकणार नाही. फाशी द्या मात्र मी बोलणारच, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement