Potholes on Mumbai Roads : खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना महापालिकेने पुन्हा एकदा चकाचक रस्त्यांचं गाजर दाखवलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रस्त्यांसाठी तब्बल 2 हजार 200 कोटी खर्च करण्यात येणार आहे. रस्त्याच्या डागडुजी आणि खड्डेविरहित रस्त्यांसाठी पालिकेने निविदा जाहीर केल्यात. या कामांमध्ये नागरी क्षेत्रातील रस्त्यांसाठी 700 कोटी तर म्हाडाच्या लेआऊट रस्त्यांकरता 300 कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. 


काही दिवसांपूर्वीच पालिकेनं बाराशे कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. मात्र, कंत्राटदारानं 30 टक्के कमी रकमेनं निविदा भरल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे या बाराशे कोटींच्या फेरनिविदा काढून वाढीव हजार कोटींच्या नव्या कामांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. मात्र कोट्यवधी खर्च केल्यानंतरही मुंबईकरांना चकाचक रस्ते मिळणार का? खड्डेमुक्त रस्त्यावरुन मुंबईकरांचा प्रवास होणार का? असे सवाल उपस्थित होत आहेत. 


मुंबईच्या रस्त्यांसाठी मुंबई महापालिका तब्बल 2200 कोटी खर्च करणार आहे. आगामी  महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना चकाचक रस्ते मिळण्याची शक्यता आहे. खड्डे, रस्त्यांच्या दूरावस्थेवरुन होणाऱ्या टीकेनंतर रस्त्यांची डागडुजी आणि खड्डेविरहीत रस्त्यांकरता पालिकेकडून निवीदा जाहीर करण्यात आल्या आहे. या कामांमध्ये नागरी क्षेत्रातील रस्त्यांसाठी 700 कोटी तर म्हाडाच्या लेआऊट रस्त्यांकरता 300 कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. 2018 मध्ये म्हाडाच्या रस्त्यांची देखभाल करण्याचं काम पालिकेकडे सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे पालिका आता म्हाडाच्या रस्त्यांवरही 300 कोटी खर्च करणार आहे. 


काही दिवसांपूर्वीच महालिकेनं 1200 कोटी रुपयांच्या निवीदा काढल्या होत्या मात्र, कंत्राटदारानं 30 टक्के कमी रकमेनं निवीदा भरल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे या 1200 कोटींच्या फेरनिवीदा काढून वाढीव 1000 कोटींच्या नव्या कामांच्या निवीदाही काढण्यात आल्या आहेत. 


रस्ते डागडुजीत निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंत्राटदारांना पूर्व कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे, अशाप्रकारच्या कठोर अटी मुंबई महापालिका कंत्राटदारांना घालणार आहे. इच्छुक कंत्राटदारांना तीन नोव्हेंबरपर्यंत दहा अर्ज भरता येणार आहे. कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराला पुढील पावसाळ्यापर्यंत रस्त्यांच्या डागडुजी करावी लागणार आहे. नव्याने निविदा काढण्यात येत असल्यामुळे या प्रक्रियेला आणखी उशीर होऊन रस्त्यांची डागडुजी होण्यास विलंब होऊ शकतो. अशातच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कंबर कसली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :