महाराष्ट्रात पूल टेस्टिंगमुळे तपासणीचा वेग दहा पट वाढेल. सध्या राज्यात रोज 4 ते 5 हजार तपासण्या करण्यात येत आहेत. इस्त्रायल आणि यूएसच्या काही भागात कोरोना चाचणीसाठी पूल टेस्टिंगचा वापर करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी
कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन,15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्टयात समाविष्ट होतील. लॉकडाऊनसंदर्भात रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. एकंदरीतच देशाता सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने सरकार सर्वोतापरी खबरदारी घेत आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये विभागणी; पाहा तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये?
तुम्ही कोणत्या झोनमध्ये येतात?
रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद
ऑरेंज झोन : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोदिया
ग्रीन झोन : धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांचा मृत्यूदर अधिक का?
महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांचा मृत्यूदर हा अधिक आहे. तो जगाच्या सरासरीहून अधिक होत चालला आहे आणि देशाच्या सरासरीचा दुपटीहून अधिक झाला आहे. आजचं चित्र जर आपण बघितलं तर जगाचा मृत्यूदर हा 6 पूर्णांक 19 आहे. देशामध्ये कारोना बाधितांची आजची संख्या 8 हजार 356 आहे. त्यापैकी 273 रुग्णांचा मृत्यू झालाय. आहे हे प्रमाण 3 पूर्णांक 27 टक्के आहे. महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण 7 पूर्णांक 21 टक्के आहे. म्हणजे जवळपास देशाचा दुप्पट. महाराष्ट्रातले कोरोना बाधित मृत्यूमुखी पडण्याचं महत्त्वाचं कारण रक्तदाब, मधुमेह, अस्थमा सारखे रोग आहेत. हे रूग्ण कोरोनावरच्या प्रत्यक्ष उपचारादरम्यान नियंत्रणात आणण्यात आपल्या यंत्रणेला अपयश येत आहे अशी वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आहे.VIDEO |
लॉकडाऊन गांभीर्याने घेतला नाही तर 30 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे