मुंबई : मंत्रालयात उपोषणाला बसलेल्या अनिवासी भारतीय महिलेला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं. ज्योती घाग असं या महिलेचं नाव आहे. ज्योती घाग ही माजी पोलिस अधिकाऱ्याची मुलगी आहे.

 

 

मुंबई पोलिसातील काही अधिकाऱ्यांनी तिला आणि तिच्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात फसवलं होतं. त्यानंतर दोघांची निर्दोष सुटकाही झाली, असा आरोप या महिलेने केला आहे.

 

 

परंतु या प्रकरणात वडिलांना अडकवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना शिक्षेची मागणी करुनही राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, असं सांगत महिलेने सोमवारी मंत्रालयात ठाण मांडलं होतं.

 

 

ही महिला सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास मंत्रालयात गेली ती बाहेर आलीच नाही. तिने तिथेच ठाण मांडलं. अखेर पोलिसांनी रात्री एकच्या सुमारास तिला ताब्यात घेतलं.