केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार, 10 राज्यातल्या 19 चेहऱ्यांना संधी, महाराष्ट्रातून सुभाष भामरे आणि रामदास आठवलेंची वर्णी, शिवसेनेला मात्र ठेंगा
----------------------------------
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला 7 जुलैचा मुहूर्त, भाजपच्या 4, शिवसेना 2, तर मित्रपक्षामधून तिघांची वर्णी लागणार
----------------------------------
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रधान सचिवांसह 5 जणांना सीबीआयकडून अटक, पदाचा दुरुपयोग करुन 50 लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका
----------------------------------
आघाडी सरकारमधील लॉटरी घोटाळ्याचा अहवाल याच आठवड्यात अपेक्षित, दोषींची गय करणार नाही, मुनगंटीवारांचे कडक कारवाईचे संकेत
----------------------------------
यवतमाळमधील शाळेतल्या लैंगिक छळाप्रकरणी किशोर दर्डाला एक दिवसाची पोलीस कोठडी, तर पोलीस संरक्षणाशिवाय मुलांना शाळेत पाठवणार नाही, आयजींच्या बैठकीत पालकांचा उद्रेक
----------------------------------
कोकण आणि विदर्भात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, कोयना आणि महाबळेश्वरवर आभाळमाया कायम
----------------------------------
दरड कोसळल्यानं माळशेज घाटातल्या वाहतुकीवर परिणाम, एका लेनमधून वाहतूक सुरु, दुरुस्तीसाठी किमान दोन दिवस लागणार
----------------------------------
गायक अभिजितला अटक करुन कारवाई करा, सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांच्यासह महिला संघटनांची मागणी, महिला पत्रकाराशी अश्लील बातचीत
----------------------------------
बलात्काराबद्दलचं सलमानचं वक्तव्य असंवेदनशील, आमीर खानची टिपण्णी, हिंदू कोड बिलावर बोलण्यास नकार
----------------------------------
मुस्लीम धर्मियांचं पवित्र स्थळ मदिनेतील पैगंबर मशिदीबाहेर आत्मघातकी स्फोट, इफ्तार पार्टीवेळी स्फोट झाल्यानं एकच हाहाकार