एक्स्प्लोर

लोकलमध्ये चढण्याच्या वादातून पोलिसाला बेदम मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल

यादरम्यान येरुलवाड यांनी आपण पोलीस असल्याचं सांगत ओळखपत्रही दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र मारहाण करणाऱ्या प्रवाशांनी त्यांचं ओळखपत्र आणि मोबाईल हिसकावत फेकून दिला.

कल्याण :  लोकलमध्ये चढताना झालेल्या वादातून पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. तानाजी येरुलवाड असं मारहाण झालेल्या पोलिसाचं नाव आहे. ते मुंबईच्या अँटॉप हिल पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शुक्रवारी ते कामावरून बदलापूरला घरी परतत होते. यावेळी कल्याण स्थानकातून त्यांनी बदलापूर लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीत काही जणांनी त्यांना धक्काबुक्की केली. यावरुन झालेल्या वादानंतर चार प्रवाशांनी त्यांना लोकलच्या डब्यात घुसून मारहाण केली. या मारहाणीत येरुलवाड यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यादरम्यान येरुलवाड यांनी आपण पोलीस असल्याचं सांगत ओळखपत्रही दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र मारहाण करणाऱ्या प्रवाशांनी त्यांचं ओळखपत्र आणि मोबाईल हिसकावत फेकून दिला. अनिकेत जैस्वाल, प्रशांत राजे आणि अन्य दोन अल्पवयीन आरोपींना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चौघे पळून जात असताना त्यांना इतर प्रवाशांनी पकडलं आणि कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात नेलं.  या चौघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन वगळता दोघांना अटक केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळीच एका प्रवाशाला तोतया पोलिसाने मारहाण केल्याचीही घटना घडली होती. त्यामुळं या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गर्दीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी प्रवाशांमधून केली जातेय. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी काहीही बोलायला नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मराठी माणसाला फसवलं! मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आणणारेच ढोंगबाजी करतायेत, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर चित्रा वाघांचा हल्लाबोल  
मराठी माणसाला फसवलं! मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आणणारेच ढोंगबाजी करतायेत, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर चित्रा वाघांचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
संजय राऊतांचे FDA च्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले तुमच्याकडे...
संजय राऊतांचे FDA च्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले तुमच्याकडे...
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Embed widget