मुंबई : आरोग्य सदृढ रहावे यासाठी आहारात ताज्या हिरव्या भाज्यांचा सहभाग रहावा, असा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, सर्वसामान्य भिवंडी, मुंबई, ठाणेकर यांच्या जेवणाच्या ताटात रोज विष पसरविणाऱ्या खाडी किनारी जागेतील केमिकल व गटारयुक्त पाण्याच्या अशुद्ध भाज्या असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून काही दिवसांपूर्वी गटारातून भाजी काढून विकत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता . 'एबीपी माझा'ने बातमी दाखवल्यानंतर त्या भाजी विक्रेत्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सर्रासपणे केमिकल व गटारयुक्त पाण्याच्या वापर करून भाज्या घेत असल्याचे धक्कादायक बाब समोर आले आहे.


बाजारात रोज दिसणाऱ्या हिरव्यागार पालेभाज्या या येतात कुठून? असा प्रश्न पडत आहे. तर या ताज्या आणि हिरव्यागार दिसणाऱ्या भाज्या या गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडी खाडी किनारच्या परिसरातील मोकळ्या जागेवर घेण्यात येतात. मात्र, या भाज्यांना लागणारे पाणी हे बाजूला वाहणाऱ्या गटारांचे पाणी देऊन भाज्या पिकविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. भिवंडी येथील कोंबलपाडा परिसरासह खाडी किनारच्या पट्ट्यात भाज्यांची मोठी शेती केली जाते. या शेतीत मोठ्या प्रमाणात पालक ,शेपू, मेथी, कोथिंबीर, चवळी अशा विविध भाज्यांचे पीक काढण्यात येते. त्या भाज्या भिवंडी, मुंबई, ठाणे सारख्या भाजी मंडईत विकण्यासाठी पाठवण्यात येत असतात.


खाडीतून वाहणार्‍या गटाराच्या सांडपाण्याचा वापर करून पालक, चवळी, मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या गटारातून वाहणार्‍या केमिकलयुक्त सांडपाण्यावरच पिकवल्या जात आहेत. जेव्हा आम्ही भाजी पिकवणाऱ्याला विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, या भाज्या खाडीच्या गटारीच्या पाण्यावर केली जात असून त्याची टेस्टिंग केली आहे. या पाण्यात प्रोटीन, लोह आहेत जेव्हा प्रमाणित पत्र मागितले तर दाखवू शकले नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे मात्र अन्न व औषध प्रशासन तसेच मनपा प्रशासन गाड झोपेत आहेत का अशा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो.


धक्कादायक बाब म्हणजे ज्या जमिनीवर अशुद्ध विषारी भाज्यांची शेती केली जात होती. ती जागा काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांची असल्याची कबुली शेती करणाऱ्यांनी दिली आहे. तसेच याबाबत माजी खासदार सुरेश टावरे यांना मोबाईलद्वारे संपर्क केला असता ही जागा त्यांचीच असल्याचे सुरेश टावरे त्यांनी सांगितले. 'मी त्याला ही जागा पोटापाण्यासाठी दिली आहे व माझी बदनामी केल्यास मी तुम्हाला कोर्टात खेचेल' अशी धमकी टावरे यांनी दिली.


तर दुसरीकडे या विषारी भाज्या खाल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर कारवाई होणे गरजेचं झालं असून या विषारी भाज्या खाल्याने अनेक आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याच समोर आलं आहे . त्यामुळे भाज्यांचे पीक घेणारे व जागा मालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे. आता प्रशासन यावर कारवाई करणार की झोपेचं सोंग घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


VIDEO | मुंबईकरांनो, तुमच्या ताटात विषारी भाज्या! | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



गटाराच्या पाण्यात भाज्या धुतानाचा व्हिडीओ व्हायरल, अंबरनाथ रेल्वे स्थानकातील प्रकार


राज्यभरात भाज्या महागल्या, 20-25 टक्क्यांनी दर कडाडले


इंधन दरवाढीनंतर भाज्या कडाडल्या