मुंबई : इंधन दरवाढीचा परिणाम हळूहळू जीवनावश्यक वस्तूवर होऊ लागला आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे भाज्याचे भावही वाढले आहे. भाजीपाला 10 ते 15 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे.
शेतकरी वाहनाने आपला माल मार्केट यार्डात विक्रीस आणतात. तर मार्केट यार्डातून मालाची खरेदी करून घेऊन जाणारे किरकोळ व्यापारीही मालाच्या वाहतुकीसाठी वाहनांचा वापर करतात. शेतकरी, किरकोळ व्यापारी या दोघांना वाहन खर्च द्यावा लागते.
इंधन दरवाढीमुळे या वाहन खर्चात वाढ झाल्यानं भाजीपाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला यांचे भाव सुमारे 5 ते 10 टक्क्यांनी वाढले आहेत.
किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले
भाजापाला किंमत (प्रति किलो)
वांगी 65-75
दोडका 60-70
कार्ली 65-75
शेवगा 80-90.
कोबी 55-65
फ्लॉवर 50-60
गाजर 60-70
काकडी 50-60
वटाणा 110-120
टोमॅटो 50-60
जुडीचा दर
कोथींबीर 25-30.
मेथी 20-30.
पालक 20-30
संबंधित बातम्या
पेट्रोल पुन्हा महागलं, 11 दिवसात 2 रुपये 17 पैशांनी दरवाढ
...तर पेट्रोल 55, डिझेल 50 रुपये प्रतिलीटरने मिळेल- गडकरी
इंधन दरवाढीनंतर भाज्या कडाडल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2018 10:46 AM (IST)
इंधन दरवाढीचा परिणाम हळूहळू जीवनावश्यक वस्तूवर होऊ लागला आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे भाज्याचे भावही वाढले आहे. भाजीपाला 10 ते 15 रुपयांनी महागला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -