नवी मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे. याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावरही झाला आहे. उत्पादन घटल्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये येणारी भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी भाज्यांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वधारले आहेत.
महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक राज्यातूनही दररोज 650 ते 700 गाड्या भरुन भाजीपाला एपीएमसीमध्ये दाखल होत असतो. मात्र आता यात 150 गाड्यांची घट झाली आहे. म्हणजेच भाज्यांची आवक 500 ते 550 गाड्यांवर आली आहे. गुजरातमधील आवक कमी झाली असून भाजीपाल्याच्या किंमती 20 ते 25 टक्क्यांनी वधारल्या आहे. फक्त वाटाणा आणि पालेभाज्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. शंभर रुपयांच्या वर असलेला वाटाणा सध्या 30 ते 40 रुपये किलो दराने विकला जात आहे.
भाजीपाला दर
भाजी
सध्या प्रति किलो दर (रुपये)
गेल्या महिन्यातील दर (रुपये)
शेवग्याच्या शेंगा
120-130
70-80
वांगी
60-70
40-50
गवार
100-110
70-80
कोबी
40-50
25-35
फ्लॉवर
50-60
35-45
भेंडी
80-90
50-60
वाटाणा
30-40
80-90
शिमला मिरची
80-90
60-70
कोंथिबीर
15-20
20-25
मेथी
15-20
15-20
पालक
10-15
20-25