भक्ष्याच्या शोधात विषारी-बिन विषारी सापांनी बदलत्या वातारणामुळे मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. गेल्या तीन महिन्यात संर्पमित्रांनी मानवी वस्तीतून शेकडो साप पकडून जंगलात सोडले. बुधवारी सापर्डे गावात राहणारे दादाजी पाटील यांच्या भात शेतातील पेंड्यातून एक नव्हे तर तीन विषारी घोणस जातीच्या सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांना जीवदान दिले आहे. अशातच आज भिवंडी तालुक्यातील कल्याण-पडघा रोडवरील बापगाव पुढील दुगाड गावात गणेश पाटील राहतात. त्याच्या घरात आज दुपारच्या सुमाराला त्यांच्या घरातील एक महिला किचनमधील फ्रिजमध्ये काही साहित्य घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना फ्रिजच्या जाळीत अडकलेला नाग दिसतात त्यांनी घराबाहेर पळ काढला आणि घरातील इतर सदस्यांना नाग घुसल्याची माहिती दिली. त्यामुळे घरातील एकाही मंडळीची घरात जाण्याची हिंमत होत नव्हती
अखेर वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करुन गणेश यांनी दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे यांनी घटनास्थळी येऊन अंत्यत विषारी नागाला फ्रीजमधून शिताफीने पकडले. मात्र, हा नाग एवढा चपळ होता की पकडण्या नंतरही दोन वेळा सर्पमित्र बोंबे यांच्या तावडीतून सुटला होता. मात्र, त्याला पुन्हा पकडून सोबत आणलेल्या पिशवीत बंद केले. विषारी साप पकडल्याचे पाहून त्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला. दरम्यान हा नाग अंत्यत विषारी इंडियन कोब्रा जातीचा असून पाच फुट लांबीचा आहे. या विषारी नागाला वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली.
साप दिसल्यास काय कराल?
साप दिसल्यानंतर प्रत्येकाचीच घाबरगुंडी उडते. अशावेळी लोक सापाला मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे न करता याची माहिती आपण सर्पमित्रांना दिली पाहिजे. महाराष्ट्रात सापांच्या चारच विषारी जाती आहेत. त्याव्यतिरिक्त काही जाती या निमविषारी, तर काही बिनविषारी आहेत.
हेही वाचा - डॉक्टर नसल्याने सर्पदंशाने तडफडून इसमाचा दवाखान्याबाहेर मृत्यू, नातेवाईकांसह नागरिकांचा संताप
Snake in Hospital | मुंबईच्या केईएम रुग्णालयात साप, रुग्णांमध्ये भीती | ABP Majha