एक्स्प्लोर

झाकीर नाईकविरोधात नवे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा सर्वेसर्वा डॉ. झाकीर नाईक विरोधात पीएमएलए कोर्टाने नव्यानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मुंबई : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा सर्वेसर्वा डॉ. झाकीर नाईक विरोधात पीएमएलए कोर्टाने नव्यानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. प्रवर्तन निर्देशनालय म्हणजेच ईडीनं यासाठी दाखल केलेला अर्ज स्वीकारत न्यायाधीश पी.पी. राजाध्यक्ष यांनी हे वॉरंट जारी केले आहे. ईडीनं दाखल केलेल्या खटल्यात कोर्टापुढे हजर होण्यासाठी झाकीर नाईकनं दोन महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र कोर्टानं नाईकचा हा अर्ज नुकताच फेटाळून लावला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात ईडीनं नाईकविरोधात आरोपपत्रही सादर केले आहे. 193.6 कोटींची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप या आरोपत्रात नाईकवर ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणातलं हे दुसरं आरोपपत्र असलं तरी प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्टखालील हे पहिलंच आरोपपत्र आहे. ज्यात झाकीर नाईकच्या काळ्या पैशांबाबत माहीती देण्यात आली आहे. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारनं नुकतीच नाईकच्या पीसी टिव्ही या चॅनलच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत मुस्लिम तरूणांची माथी भडकवल्याचा आरोप असलेला इस्लामी उपदेशक डॉ. झाकिर नाईक याच्या माझगावमधील पाच मालमत्तांवर जप्ती आणण्याचे आदेश मुंबईच्या विशेष न्यायालयाने दिले होते. 'क्रिस्टल रेसिडेन्सी' या इमारतीच्या ए विंगमधील ए-103 हा एक हजार 363 चौ. फुटांचा व्यावसायिक गाळा, जास्मिन सोसायटीमधील बी-1005 व बी-1006 हे दोन फ्लॅट, मारिया हाईट्स या इमारतीतील 1701 व 1702 हे दोन फ्लॅट अशा पाच मालमत्तांवर टाच आणण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते. 52 वर्षीय झाकिर नाईकच्या प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणांमुळे दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन मिळत असल्याचे उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये त्याची मुंबईतील 'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' ही संस्था बेकायदा ठरवली. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच (एनआयए) कडून त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे नोंदवले. गुन्हा नोंदवला गेला तेव्हा नाईक देशाबाहेर होता, जो अजूनही भारतात परतलेला नाही. आयआरएफ या संघटनेवर बंदी घातल्यानंतर तपास यंत्रणांनी त्यांची वेबसाईट, सोशल नेटवर्किंग अकाऊंट, यु ट्यूब चैनल सारं काही बंद करून टाकलंय. तसेच देशभरात 17 ठिकाणी छापे घालून या संघटनेशी संबंधित अनेकांना अटकही केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Sanjay Shirsat VIDEO : राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले? 
राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले? 
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
Embed widget