Narendra Modi  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणा-या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. 10 फेब्रुवारी म्हणजेच, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील. त्यानंतर त्या दोन्ही गाड्या रवाना होतील. सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे लाईनवरच वेगवान आणि आरामदायक प्रवास यासाठी या ट्रेन बनवण्यात आल्यात. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही पहिली सेमीस्पीड ट्रेन आहे. पूर्णपणे एसी, वायफाय, अद्ययावत सस्पेंशन, पूश बैक सीट्स अशी या रेल्वेची खासियत असणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनासाठी आणि मरोळ येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत येणार आहे. संपूर्ण मुंबईत पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आधीच सतर्क झाले असून त्यांनी मंगळवारी ऑलआऊट ऑपरेशन केले, तसेच याबाबत वरिष्ठांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक झाली.  त्यांच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कसा असाल?


पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2.10  मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल होतील.
मुंबई विमानतळावरून हेलिकॉप्टरने आयएनएस शिक्रावरती येणार
दुपारी 2.45 वाजता  सीएसएमटी स्थानकावर पोहोचतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्लॅटफॉर्म अठरा वर दोन मिनिटांसाठी चालत वंदे भारतच्या ट्रेनकडे जाणार आहेत.  
वंदे भारतमध्ये लहान मुलांसोबत 7 मिनिट मोदी गप्पा मारतील
वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, साधारणता 3 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल
1 मिनिटांचं यासंदर्भात प्रेसेंटेशन मोदींना दिलं जाईल
प्लॅटफॉर्म 18 वरून वाहनाच्या दिशेने 2 मिनिटात पोहोचतील आणि तिथून आयएनएस शिक्रावरतीदाखल होतील
सीएसएसटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर 18 वरती हा साधारणता 15 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल
पुन्हा 3.55 ला सीएसटी वरून आयएनएस शिक्रावरती दाखल होतील. पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईविमानतळाच्या दिशेने रवाना होतील.
दुपारी 4.20 मिनिटांनी मुंबई विमानतळ दाखल होतील.
मुंबई विमानतळ ते मरोळ कारने जाणार आहेत. 
मरोळ येथील कार्यक्रमाला 4.30 वाजता पोहचतील, 
ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसच उद्घाटन होईल.
5.50 वाजता मरोळहून कारने मुंबई विमानतळावर जाणार आहेत. 
सहा वाजता मुंबई विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत. 


मरोळमध्ये जय्यत तयारी -


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मरोळमध्ये मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मरोळमध्ये मोठ्या संख्यामध्ये बोरी मुस्लिम समाज राहतो. बोरी मुस्लिम समाजाकडून मुंबईमध्ये पहिल्यांदा अल जामिया युनिव्हर्सिटी उभारण्यात आली आहे. याच युनिव्हर्सिटीचे उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी साडेचार वाजता मरोळमध्ये येणार आहेत.


मोठा बंदोबस्त -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मरोळमध्ये आगमनाआधी मुंबई महानगरपालिकाकडून आणि मुंबई पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मरोळ परिसर हा मोठा झोपडपट्टीच्या परिसर असल्यामुळे पोलिसांसमोर मोदींच्या दौरासाठी मोठा आव्हान असणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या 1000 जवान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मरोळ मध्ये दौरासाठी तैनात करण्यात आला आहे. यात मुंबई पोलिसांचे पाच डीसीपी, 200 अधिकारी, 800 अंमलदार मोदी यांच्या बंदोबस्त साठी तैनात असणार आहेत.