BJP Leader Mohit Kamboj: भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलासा दिला आहे. कंबोज यांच्या सांताक्रुझमधील (Santacruz) चार फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंजूर आराखड्यानुसार, बांधकाम नसल्यानं तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं (Maha Vikas Aghadi Government) कंबोज यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर कंबोज यांनी नगरविकास खात्याकडे अपील केलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय देत कंबोज यांना दिलासा दिला आहे. खास बाब म्हणून निर्णय दिला असून इतर प्रकरणांमध्ये हे प्रकरण उदाहरण म्हणून मानलं जाऊ नये, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


काही दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांना पालिकेनं नोटीस पाठवली होती. त्यानंतर कंबोज यांच्या घरी मुंबई महापालिकेचं एक पथक दाखल झालं होतं. सांताक्रूझ येथे ज्या इमारतीत कंबोज यांचं निवासस्थान आहे, त्या इमारतीची पालिकेच्या पथकाद्वारे पाहणी करण्यात आली होती. कंबोज यांच्या घरात पालिका पथक दाखल झालं होतं. त्यावेळी त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यावेळी घराची केवळ पाहणी करण्यात आली होती. 


पाहा व्हिडीओ : CM On Kamboj Flat : भाजप नेते Mohit Kmboj यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिलासा



मोहित कंबोज यांच्या घरासोबतच त्यांच्या कार्यालयात झालेल्या अनधिकृत बांधकामांशी संबधित नोटीसही त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना दिली होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मोहित कंबोज यांना फटका बसू शकतो, असं बोललं जात होतं. तसेच, एमआरडीपी या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार असंही बोललं जात होतं. त्यांनी आपल्या घरात आणि कार्यालयाच्या बांधकामात काही बदल केल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं.