एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर दिसणार

मुंबईतील राजभवन इथे उद्या (14 जून) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उद्या (14 जून) एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील राजभवन इथे उद्या (14 जून) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल.

एप्रिल महिन्यात लता मंगेशकर फाऊंडेशन पुरस्कार घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं होतं. मात्र राजभवनात उद्या दुपारी चार वाजता क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत. 

पंतप्रधान एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये (Dehu) आहे. संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.

यापूर्वी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट कधी?
याआधी लता मंगेशकर फाऊंडेशनचा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात आता होता. तेव्हा कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला जाणं टाळलं होतं. त्याउलट मुख्यमंत्री एका आजीबाईंची भेट घेण्यासाठी गेले होते, ज्या मातोश्री या निवासस्थानी आंदोलनाला आल्या होत्या. तेव्हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या दुरावा असल्याची चर्चाही रंगली होती. त्याआधी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट लता मंगेशकर यांचं निधन झालं होतं तेव्हा झाली होती. ही भेट सार्वजनिकरित्या आणि सगळ्यांसमोर झाली होती. तर त्याआधी दिल्लीमध्ये या दोघांची भेट झाली होती. पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या 40 मिनिटांच्या भेटीनंतर हे दोघेही फारसे प्रत्यक्षात भेटलेले नाहीत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एखाद दुसऱ्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहिलेली होती.

महत्त्वाच्या बातम्या

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget