एक्स्प्लोर
कोलकाता, चेन्नई पाठोपाठ डोंबिवलीतही प्लास्टिकची अंडी?
डोंबिवली: कोलकाता आणि चेन्नईमध्ये प्लास्टिकची अंडी सापडल्यानंतर डोंबिवलीतही प्लास्टिकची अंडी विकली जात आहेत का? असा सवाल उपस्थित होतो आहे. डोंबिवलीतल्या गोग्रासवाडीतील एका ग्राहकाला याचा अनुभव आला आहे.
अमेय गोखले असं या ग्राहकाचं नाव असून त्यानी मंगळवारी 2 अंडी खरेदी केली. मात्र, ऑम्लेट करताना त्याला नेहमीसारखा वास आला नाही. तसंच त्याची चवही वेगळी लागल्यानं त्यांची शंका आणखी बळावली. त्याचबरोबर अंड्याच्या टरफलातून प्लास्टिकचा दोराही निघाल्याचं त्याचं म्हणणं आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी अमेय गोखले यांनी केली आहे.
प्लास्टिकची अंडी ओळखायची कशी?
- प्लास्टिक अंड्यांच्या आतला पिवळा भाग हा जिलेटीन, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, सोडिअम एल्गिनाईटसारख्या रसायनांनी बनलेला असतो. याच रसायनांनी अंड्यांचा बाहेरील भाग बनवला जात असल्याचीही शक्यता आहे.
- प्लास्टिकची अंडी उकळल्यानंतर अंड्यांचा बाहेरचा भाग तोडल्यास कडक होतो. नेहमीच्या अंड्यांपेक्षा बनावट अंड्यांच्या आतील पिवळा भागाचा रंग अधिक गडद असतो.
- बनावट अंड्याच्या आतील पिवळा पदार्थ तव्यावर टाकल्यास तो तसाच राहतो. साधारण अंड्यांच्या पिवळ्या पदार्थासारखा तव्यावर पसरत नाही.
अंड्यांमधील ही हानीकारक रसायनं तुमच्या जीवाला धोकादायक ठरू शकतात. अंडी आपल्या जेवणाच सर्रास वापरली जातात. त्यामुळं चुकून अशी प्लास्टिकची अंडी आपल्या पोटात गेली तर मोठी किंमत मोजावी लागू शकते.
VIDEO:
संबंधित बातम्या:
PHOTO: प्लॅस्टिकची अंडी ओळखायची कशी?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement